ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून गरजूंना आ. कैलास गोरंट्याल यांच्या वतीने 1 लाख रूपयाचे अन्नधान्य व इतर वस्तूंचे वाटप

August 2, 202115:16 PM 20 0 0

जालना (प्रतिनिधी) ः साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आ. कैलास गोरंट्याल यांनी रविवार रोजी जयंती दिनानिमित्त येथील अण्णाभाऊ साठे नगर (रेल्वे स्टेशन रोड, जालना) येथील गोर-गरीब गरजूंना 1 लाख रूपयांचे अन्नधान्य आणि वस्तूंच्या किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. अण्णाभाऊ साठे नगर येथे जयंती दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात गोर-गरीब आणि गरजूंना आ. कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल, युवानेते अक्षय गोरंटयाल यांच्याहस्ते अन्नधान्याच्या किट वाटप करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक साबळे हे होते. त्याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, विनोद आठवे, सुरेश घोडे, चंद्रकांत रत्नपारखे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक साबळे यांनी बोलतांना सांगीतले की, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त करोना आजाराचा काळ असल्यामुळे गोर-गरीब, दिनदलित यांच्या हाताला काम नाही त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गरीबांचा पोटापाण्याचा प्रश्‍न असल्यामुळे जयंती उत्सव समितीने अन्नधान्य आणि वस्तूंच्या किट वाटपाचा मनोदय व्यक्त केला होता. त्याअनुषंगाने आ. कैलास गोरंटयाल यांनी यासाठी 1 लाख रूपयांची आर्थिक मदत केल्यामुळे उत्सव समितीच्या वतीने समाज बांधवांना किट वाटप करण्यात येत असल्याचे श्री साबळे यांनी सांगीतले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक विनोद आठवे यांनी करतांना सांगीतले की, आ. कैलास गोरंट्याल यांनी मदतीचा हात पुढे केल्यामुळे हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगुन मातंग समाजाच्या असलेल्या अडीअडचणी आणि समस्या आ. गोरंट्याल यांनी दुर केलेले आहेत. आगामी नगर परिषदेच्या निवडणूकीत समाजबांधवांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संधी द्यावी अशी मागणी देखील श्री आठवे यांनी केली.
याप्रसंगी दशरथ कांबळे, सोपान साळवे, किशोर कांबळे, द्वारकाबाई लोंढे, संतोष निकाळजे, नंदाताई पवार, जावेद शेख, मोहिनीताई साबळे, किरण सिरसाठ, दाविद गायकवाड, अरूण घडलिंग, शेख शफीक, सागर ढक्का आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण सिरसाठ यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *