ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अण्णाभाऊंचे साहित्य सामान्यांच्या वेदनेतून- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

August 3, 202212:58 PM 14 0 0

जालना : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व कथेतील पात्र हे सामान्य लोकांचे आहेत. त्यांचे साहित्य वाचतांना ते कल्पीत कथा न वाटता आपल्या आजु-बाजुला घडलेल्या घटना वाटतात. त्यांचे सुखःदुख वाटतात. महाराष्ट्रात संत, महापुरुष, समाजसुधारक यांचा वारसा लाभलेला आहे. आजच्या तरुण पिढीने या सर्वच महापुरुषांची चरित्र्य, साहित्य वाचले तर त्यांचे मार्ग कधीच भरकटणार नाहीत, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले.
जालना शहरातील जवाहर बाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कुल येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गरजु विद्याथ्र्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विजयकुमार पंडीत, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, दिपक रणनवरे, किशोर कदम, माजी गटशिक्षण अधिकारी बी.के. बोरुडे, किशन लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, थोर समाजसुधारकांनी दिलेले विचार अंगीकारले तर प्रत्येकाच्या जीवनाचे कल्याण होईल व त्याचीच गरज आज आहे. चौका-चौकात बसून आपला संबंध नसतानाही अनेक राजकीय घडामोडी यावरील चर्चेत वेळ घालविण्यापेक्षा जर आपण महापुरुषांची चरित्र्य वाचली तर तुमचे जीवन समृध्द होईल.

एवढी ताकद या साहित्यात असल्याचे अंबेकर म्हणाले. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सर्व पक्षीय जयंती उत्सव समितीच्या आयोजित करण्यात आलेल्या शालेय साहित्य कार्यक्रमास रविकांत जगधने, संतोष खंडागळे, श्रावण ससाने, पवन वाघमारे, फारुख, कचरु मिसाळ, धोंडीराम आडगळे, प्रदीप सराटे, किशोर कदम, किशन दांडगे, अनिस, मुस्ताक, बंडू निकाळजे, जफार,अरुण गाडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *