ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अंनिस’ने रोखले तब्बल चार बालविवाह

March 7, 202112:27 PM 119 0 0

नगर : भटक्या समाजात, औरंगाबाद जिल्ह्यत लावले जात असलेले तब्बल चार बालविवाह अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव अॅसड. रंजना गवांदे यांच्या सतर्कतेने थांबवले गेले. या चारही मुली नगर जिल्ह्यतील आहेत. मसणजोगी या भटक्या समाजातील अनिष्ट जातपंचायत गवांदे यांच्या प्रयत्नातून बरखास्त झाल्या. मात्र याच समाजातील पंचायतीचे पंच प्रतिष्ठेसाठी बालविवाह लावण्यात पुढाकार घेत असल्याचे आढळले आहे.

औरंगाबादमधील बिडकीन येथील दोन व लासुर स्टेशन येथील दोन असे एकूण चार विवाह गेल्या गुरुवारी व शुक्रवारी महिला बालकल्याण विभाग व पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने थांबवले गेले आहेत. या घटनेतील मुली अवघ्या ९, १०, ११ व १३ वर्षांंच्या आहेत. बिडकीन येथे विवाह होत असलेल्या मुली शेवगाव तालुक्यातील तर लासुर स्टेशन येथे होत असलेल्या विवाहातील मुली नेवासा फाटा भागातील आहेत. या बालविवाहाची माहिती अॅड. गवांदे यांना मिळाली होती.

बिडकीन व लासुर स्टेशन परिसरातील वाडय़ा-वस्त्यांवर हे विवाह लावले जात होते. गवांदे यांनी महिला बालकल्याण व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व संबंधित वाडय़ा-वस्त्यांवर जाऊन बालविवाह थांबवले. या चारही मुलींना आता त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले असले तरी या मुलींना बालसुरक्षा समितीपुढे हजर करण्याच्या नोटिसा संबंधित पालकांना बजावल्या गेल्या आहेत. अॅड. गवांदे यांनी मसणजोगी या भटक्या समाजातील जातपंचायत बरखास्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु या पंचायतीचे पंच आता खोटय़ा प्रतिष्ठेसाठी बालविवाह लावण्यात पुढाकार घेत असल्याचे आढळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *