ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शांतिनिकेतन विद्या मंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई यांची जयंती साजरी

January 4, 202113:42 PM 51 0 0

जालना : जालना शहरातील संभाजीनगर प्रभागातील शांतिनिकेतन विद्या मंदिर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई पुâले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई पुâले यांच्या प्रतिमेस पंचायत समितीच्या सभापती विमल पाखरे व संस्थेच्या संचालक शोभाताई अंबेकर, सुनिता कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सुनिता वाघमारे, सुनंदा खरात यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई पुâले यांच्या जयंती शिक्षणदिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी अत्यंत गरीब कुटूंबातून व मोलमजुरी करुन पुढे येत राजकारणात प्रवेश करुन पंचायत समितीच्या सभापती विमल पाखरे यांचा तसेच उच्च शिक्षण घेवून स्वबळावर जालना शहरात मागील २० वर्षांपासून साई कम्प्युटर इन्स्टुट्यूट यशस्वीपणे चालविणाNया सुनिता कदम यांचा प्रतिनिधीक स्वरुपात गौरव करण्यात आला.

यावेळी बोलतांना संस्थेच्या संचालक शोभाताई अंबेकर म्हणाल्या की, सावित्रीबाई पुâले यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत व तत्कालीन समाजाचा रोष पत्कारुन अंगावर दगडधोंड, शेण यांचा मारा सहन करुन स्त्रींयासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर त्यांच्या पेक्षा काकनभर सरस काम करत आहेत. राजकारण, समाजकारण, उद्योग,आरोग्य, शिक्षण आदी सर्वच क्षेत्रात स्त्रीयांनी आपले कर्तत्व सिध्द केले आहे. अशारितीने असंख्य स्त्रींया केवळ सावित्रीबाई पुâले यांच्या मुळेच स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या. आज सर्वच क्षेत्र सर्वांसाठी खुली झालेली आहेत. मुलींनी अत्यंत चांगल्या पध्दतीने शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहावे, असे आवाहनही शोभाताई अंबेकर यांनी केले. यावेळी शाळेतील महिला शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *