ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण विधानसभा मतदारसंघातील गव्हाण विभाग, वडघर विभाग, करंजाडे शहर व उलवा नोड शहर मधील युवासेनेच्या नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

October 31, 202115:01 PM 17 0 0

उरण दि 30(राघवी ममताबादे ) :हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख मा. श्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील वडघर विभाग, गव्हाण विभाग, करंजाडे शहर व उलवा नोड शहर मधील युवा सेनेच्या नवीन पदाधिकारी नियुक्या दिनाकं 07 ऑक्टोबर 2021 व 28 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर केल्या.

यामध्ये युवासेना गव्हाण विभाग सचिव राहुल कोळी, गव्हाण शाखा युवा अधिकारी विकास कोळी ,गव्हाण युवासेना विभाग कार्यकारणी सदस्य श्रीधर पाटील, धनराज मोकळ, युवासेना विभाग संघटक रोनीत भोईर, उलवा नोड युवासेना संघटक राजेशसिंग रामलखन यांच्या नियुक्या जाहीर केल्या आहेत. तर वडघर जिल्हा परिषद उपतालुका अधिकारी भालचंद्र घरत, वडघर पंचायत समिती विभाग अधिकारी रोशन भगत, करंजाडे शहर अधिकारी निखील भोपी, चिंचवन शाखा अधिकारी अनिल तांबे व चिंचवन उप शाखा अधिकारी योगेश ठोंबरे यांच्या नियुक्या जाहीर केल्या आहेत.
आपण शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणाना अनुसरून वाटचाल करून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी, पक्ष बांधणीसाठी आणि विस्तारासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावे. अशा शुभेच्छा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी यावेळी दिल्या.
यावेळी उरण विधानसभा संपर्कप्रमुख तथा कामगार नेते महादेव घरत, पनवेल तालुका युवासेना अधिकारी कु गौरव म्हात्रे, वडघर विभागप्रमुख नंदकुमार मुंडकर व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *