ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नवयान बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे पुरस्कार जाहीर

December 20, 202112:03 PM 47 0 0

नांदेड – येथील सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र प्रणित जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या नवयान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोणार या यजमान संस्थेकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी जे.डी. गोणारकर यांना सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार तर पत्रकार प्रमोद चौधरी ( उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार), प्रा. अशोककुमार दवणे यांना साहित्य तर जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी अमिन पठाण यांना जीवनशिक्षण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच इतरही मान्यवरांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

पहिल्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात गोणार येथे २७ डिसेंबर रोजी उद्घाटन सत्रात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यात डॉ. शेटवाड, ग्रामीण रुग्णालय, मुखेड (वैद्यकीय पुरस्कार), साहेबराव इंगोले, मराठी चित्रपट दिग्दर्शक ( सिने अभिनेता पुरस्कार), लक्ष्मण कोंडावार ( उत्कृष्ट वक्तृत्व पुरस्कार), दिलीप बेंद्रे ( वित्तसंस्था पुरस्कार), शंकर राठोड ( कवीरत्न पुरस्कार ), एम. टी. वाघमारे ( आदर्श शिक्षक पुरस्कार), पी. एम. तोडे ( धम्मरत्न पुरस्कार ), गणेश कदम ( सामाजिक पुरस्कार), माधव जाधव ( उत्कृष्ट गीतकार पुरस्कार), पूजा मेटे विद्रोही कवयित्री पुरस्कार कु. पूजा वसंतराव ढवळे ( विद्रोही कवयित्री) यांचा समावेश आहे. तसेच राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रसिद्ध कथाकार विलास सिंदगीकर यांनाही याच कार्यक्रमात मातोश्री भागाबाई डोंगरे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *