ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रयत इंग्लिश मिडीयम स्कूल दहिवडी यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात व दिमाखात साजरा

April 30, 202214:04 PM 60 0 1

सातारा, (विदया निकाळजे ) : दि. २८ एप्रिल  २०२२ रोजी दहिवडी कॉलेज दहिवडी येथील मल्टिपर्पज हॉल मध्ये रयत इंग्लिश मिडीयम स्कूल दहिवडी यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दहिवडी नगरपंचायतीचे नगर सेवक मा. श्री. महेश जाधव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ. पवार मॅडम मुख्याध्यापिका कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बीजवडी, मा. श्रीम. जाधव रेखा मॅडम मुख्याध्यापिका, न्यू इंग्लिश स्कूल महिमानगड, मा. श्री. इम्तियाज नदाफ स्कूल कमिटी सदस्य उपस्थित होते.

सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. भारती जाधव मॅडम यांनी केले. मुख्याध्यापीका सौ. भारती जाधव मॅडम यांनी मान्यवरांचा परिचय करून देत अहवाल वाचन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाळेच्या एकंदरीत प्रगती वरती समाधान व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक इयत्तेतील भाषण स्पर्धा, लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निंबध स्पर्धा, कोविड पोस्टर स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, गीत गायन, नृत्य, वेशभूषा अशा विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच मैदानी स्पर्धांमध्ये कब्बड्डी, खो खो, डॉज बॉल, लंगडी, 50 मी, 100मी, 200 मी धावणे दोरीवरील उड्या या मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच पालकांसाठी 50 मी धावणे, रिले शर्यत या स्पर्धा आयोजित केल्या होत्या अशा विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अनेक पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार श्री. निलेश भिवरकर सर यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *