ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत मोफत प्रशिक्षण घेण्याचे आवाहन

February 16, 202215:01 PM 39 0 0

सातारा हिरकणी [विदया निकाळजे] : जिल्ह्यातील युवक युवतींचे कौशल्य प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभाग,सातारा यांचेमार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्हास्तरीय किमान कौशल्य विकास कार्यक्रम 2021-2022 अंतर्गत वय वर्ष 18 ते 45 असणाऱ्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोविडमुळे कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबातील व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल.
या प्रशिक्षण हॉस्पिटॅलीटी अँड टूरिझम, अग्रीकल्चर, फूड प्रोसेसिंग, अॅपरल, ऑटोमोटिव्ह, बँकिंग, इलेक्ट्रॉनिक अँड हार्डवेअर, कॅपिटल गुड्स, आयटी-आयटीइएस, मिडीया अँड एंटरटेनमेंट, लॉजीस्टिक,प्लंबिंग टेलिकॉम, डोमेस्टिक वर्कर, मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांशी निगडीत जॉबरोलचे प्रशिक्षण उमेदवारांच्या पसंतीनुसार जिल्ह्यातील खाजगी प्रशिक्षण संस्थामार्फत मोफत देण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना परीक्षेअंती प्रमाणपत्रासोबतच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी देखील प्राप्त होणार आहेत.
अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, एस.टी. स्टॅडजवळ, सातारा. येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा 02162 – 239938 या दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *