ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महिला सक्षमीकरणासाठी खेळाद्वारे सर्वांसाठी सदृढता कार्यक्रम राबविण्याचे आवाहन

March 2, 202216:58 PM 39 0 0

सातारा हिरकणी [विदया निकाळजे] : घबराटीच्या वातावरणामुळे महिलांच्या मनात निर्माण होणारी भिती घालविण्याच्यादृष्टीने, त्यांची स्वसंरक्षणाची मानसिकता निर्माण करण्याच्या दृष्टीने विशेषत: महिला वर्गाला स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी “ खेळाद्वारे सर्वांसाठी सदृढता ” हा कार्यक्रम जिल्ह्यात प्रत्येक शाळेत व महाविद्यालयात महिलांसाठी तसेच विद्यार्थींनीसाठी राबवावा.
या कार्यक्रमांतर्गत महिलांकरिता तालुकास्तर व जिल्हास्तरावर तायक्वांदो, कराटे व ज्युदो आदी खेळांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात यावा. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत तालुकानिहाय तज्ञ मार्गदर्शकांची निवड करण्यात आलेली आहे. संबंधित शाळांनी व महाविद्यालयांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन तज्ञ मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली माहे मार्च 2022 अखेर प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवावा असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) धनंजय चोपडे व जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *