ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्रामणेर प्रशिक्षण शिबीराकरिता नाव नोंदणी करण्याचे आवाहन

February 8, 202114:37 PM 43 0 0

नांदेड – तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे माघ पौर्णिमेनिमित्त दहा दिवसांचे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून प्रशिक्षण केंद्रातील भिक्खू संघ मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबिर १७ फेब्रुवारी पासून २७ फेब्रुवारी पर्यंत राहणार आहे. श्रामणेर प्रशिक्षण शिबीराकरिता दिनांक १६ फेब्रुवारी पर्यंत प्रत्यक्ष केंद्रात येऊन किंवा व्हाट्सअपवर नाव नोंदणी करावी. शिबिरपूर्व नाव नोंदणी करण्याचे आवाहन प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी एका व्हिडीओ क्लिपद्वारे केले आहे.

माघ पौर्णिमेला बौद्ध धम्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तथागत गौतम बुद्धांनी वैशालीतील वेलाग्राममध्ये ४५ वा वर्षावास केला होता. तसेच माघ पौर्णिमेलाच त्यांनी भंते आनंदाला सांगितले की, बरोबर तीन महिन्यांनी वैशाखी पौर्णिमेला तथागत महानिर्वाण स्विकारणार आहेत. त्यामुळे ही पौर्णिमा बौद्ध राष्ट्रांत महत्वाची मानली जाते. याचेच औचित्य साधून खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात येत्या दि. १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी पर्यंत १० दिवस श्रामणेर दीक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दहा दिवसात भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भदंत मेत्तानंद, भदंत संघरत्न, भंते चंद्रमणी, भंते धम्मकिर्ती, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते शिलभद्र, भंते सदानंद हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कालावधीत विविध पूजा पाठ, गाथापठण व बौद्ध जीवन दिनचर्या यासंबंधीची शिकवण दिली जाणार आहे. तरी इच्छुकांनी ८३०८८८७९८८, ९५७९२०९७५२, ९५२९२०९५७१, ९५७९४१५२५८, ९५५२१३०६४६, ७३५०८५९४४३ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी असे आवाहन प्रा. साहेबराव इंगोले, गंगाधर ढवळे, प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, साहेबराव नरवाडे, नागोराव नरवाडे, निवृत्ती लोणे आदींनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *