ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पर्यावरण पूरक प्रदर्शनास शालेय मुले,शिक्षक ,पालक,अधिकारी व कर्मचारी यांना भेट देण्याचे आवाहन : गीता नाकाडे

October 12, 202114:08 PM 75 0 1

जालना शहरातील नारायणी फाऊंडेशन व व्यकंटेश क्लासेस चे संचालक,जालना जिल्हा कोविड योद्धा पुरस्कार प्राप्त,विद्यार्थी प्रिय शिक्षक, उत्कृष्ट व्याख्याते,लेखक,कवी व उत्कृस्ट चित्रकार,शालेय मुलांना मातीपासून विविध कलाकृती शिकवणारे बहुगुणी व चौकस व्यक्तीमत्व असणारे प्रा.श्रीकांत चिंचखेडकर सर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या कलाकृतीतून हिमालयाचे व पर्वत रांगांत शंकराचे नऊ अवतार अगदी हुबेहूब पद्धतीने तयार केले.चेहऱ्यावरील हावभाव,रंगसंगती,या संदर्भातील प्रदर्शन जालना वासीयांना व कलाप्रेमी असणाऱ्या सर्वांसाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिले आहे.मागील 17 वर्षांपासून निरंतर ह्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या समोर आदर्श निर्माण केला.लहान थोर कलाप्रेमी ना कला शिकवण्यासाठी अहोरात्र परिश्रम परिश्रम घेतले.सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व जोपासून स्वनिर्मित नैसर्गिक कलाकृती विविध प्रकारच्या उत्कृस्ट रांगोळ्या,शेकडो पुस्तकांचे मोफत वाचनालय,मुलांना शैक्षणिक कार्यात निस्वार्थ मदत करून कोरोना काळात गरजवंताला मदत करून सहकार्य करणारे आदर्श शिक्षक यांच्या कार्याची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सरांना आदर्श कोरोना योद्धा जालना जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.


दिनांक 07/10/2021 रोजी शिक्षण विभाग पंचायत समिती जालना चे गटशिक्षणाधिकारी मा.श्री भरत वानखेडे साहेब यांच्या आदेशाने पथक प्रशिक्षण स्थळी भेट देऊन शालेय मुलांना पर्यावरण पूरक साहित्य निर्मिती उपक्रम कला व कौशल्य शहरी भागातील व ग्रामीण भागातील होतकरू व कलेची आवड असणाऱ्या मुलांसाठी सहजतेने उपलब्द होण्याहेतु भेट देण्यासाठी गेले.या वेळी प्रा.श्रीकांत चिंचखेडकर सर यांनी तयार केलेल्या कोविड 19 काळात स्वछता व समाजाने घ्यावयाच्या वोविध काळजी चे पायऱ्यांवर सुविचार चे नियोजन व कार्यवाही स्पस्ट केली.त्यानंतर महत्वाचे आकर्षक म्हणजे 6 ते 7 फूट उंचीच्या मूर्ती किमान नऊ शंकराचे अवतार व त्याची माहिती जाणून घेण्यासाठी उपस्थित झाले. या वेळी विस्तार अधिकारी मा.गीता नाकाडे मॅडम,समग्र शिक्षा सहा.कार्यक्रम अधिकारी सुनील मावकर सर,प.स जालना चे वरिष्ठ लेखा अधिकारी ए. एम.वाघ सर,सावंगी तलान केंद्राचे केंद्रप्रमुख मा.फय्याज शेख सर,केंद्रसमनवयक भागवत जेटेवाड सर,RTI चे समनवयक मा.गणेश काळे सर व पाथ्रूड तांडा शाळेचे मुख्याध्यापक नारायण माहोरे सर उपस्थित होते.शिक्षण विभागाच्या वतीने पर्यावरण पूरक प्रदर्शनास शुभेच्छा देऊन कौतुक करण्यात आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *