ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1 31 जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन

January 13, 202213:52 PM 37 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरुष, स्त्री, एकूण ( त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1) सेवायोजन कार्यालयास ऑनलाईन सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे.

त्रेमासिक विवरण पत्र (ईआर-1) दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने https://rojgar.mahaswyam.gov.in या बेबपोर्टलवर सादर करावे. प्रत्येक नोंदणीकृत आस्थापनेस युजर आयडी, रजिस्ट्रेशन आयडी व पासवर्ड यापूर्वीच दिलेला आहे. या संदर्भात काही समस्या असल्यास, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, तळ मजला, सातारा येथे अथवा कार्यालयाच्या 02162-239938 येथे संपर्क साधावा.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *