जालना (प्रतिनिधी) : शहरातील जवाहरबाग येथील आनंदेश्वर महादेव मंदिरात भाजपाचे झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष नेमीचंद भुरेवाल यांच्या नेतृत्वाखाली मिशन कवच कुंडल अंतर्गत लसीकरणाचे सात दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक संदीप नाईकवाडे, ओमप्रकाश शिंदे, राजेश पडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्याचे स्वागत नेमीचंद भुरेवाल, हेमंतकुमार भुरेवाल, कचरु गायकवाड, सुभाष आढाव यांनी शाल व पुष्पहार देवून केले.
सदर कवच कुंडल लशीकरण शिबिर दि. 7 ते 14 ऑक्टोंबर पर्यंत सुरू राहणार असून नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबीरात जवाहरबाग परिसरातील आकाश भुरेवाल, हेमंत भुरेवाल, सुभाष आढाव, प्रकाश घोडे, पंकज भुरेवाल, कचरु गायकवाड, भाजपचे शहराध्यक्ष सुनील खैरे, गेंदालाल झुंगे यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदविला आहे.
Leave a Reply