ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कौशल्य विकास क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांनी व उद्योजकांनी कौशल्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

April 1, 202214:29 PM 53 0 0

सातारा हिरकणी(विदया निकाळजे) : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ही राज्यातील कौशल्य विकासाची शिखर संस्था असून राज्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकतेचे प्रमाण वाढवणे हे या संस्थेचे ध्येय आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना मोफत प्रशिक्षण दिले जाते व त्यांना रोजगारांची संधी देखील प्राप्त करुन देण्यात येते.

तरी या क्षेत्राशी निगडीत असलेल्या किंवा काम करण्यास इच्छुक असलेल्या स्वयंसेवी संस्थांना व उद्योजकांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीबरोबर सामंजस्य करार करायचा असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, सातारा येथे भेट द्यावी किंवा कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सु.श. पवार यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *