ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बहुजन समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी हरिष रत्नपारखे यांची नियुक्ती

July 18, 202119:20 PM 39 0 0

जालना(प्रातिनिधी) बहुजन समाज पार्टी जिल्हा जालना जिल्हाध्यक्षपदी हरिष रत्नपारखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड बसपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड. संदिप ताजने यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.
फुले, शाहू, आंबेडकर व कांशीरामजी यांच्या चळवळीतील अतुलनीय योगदान आणि बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन कु. मायावतीजी यांच्यावर अढळ विश्वास, सामाजिक कार्यातील कृतिशीलतेच्या आधारावर हरिष रत्नपारखे यांची बसपा जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली असल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.


बहुजन समाज पार्टी जिल्हा जालना कार्यकारीणीच्या दि.18 जुलै रोजी 488, गेस्ट हाऊस, जालना येथे दुपारी 12 वा. बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बसपा प्रदेश सचिव प्रभात खिल्लारे यांच्या हस्ते हरिष रत्नपारखे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या बैठकीस बसपा प्रदेश सचिव प्रभातजी खिल्लारे, प्रदेश सचिव प्रा. निवृत्ती बनसोडे यांची उपस्थिती होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रमेश उबाळे यांची उपस्थिती होती. यावेळी ज्ञानेश्वर गरबडे, रंजित हिवाळे, शेख रज्जाकभाई, विवेक दिहिवाल, अनिल मोरे, चंद्रमुनी गाढेकर,दिलीप हिवाळे, अजय गाढे, दिपक हिवाळे, बाबासाहेब वाघमारे, विलास मगरे, लालाभाई खरात, अंकुश गाढेकर, रमेश म्हस्के, राजु खरात. गोविंद खरात, सचिन जाधव, सिद्धार्थ मोरे अनिल खरात सुरज गाडेकर विशाल गवाई विजय काळे भगवान जोगदंड, कपिल जाधव शिवाजी जाधव, लहाने मंठा, सचिन गाढेकर यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *