ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जैबुनीसा शेख यांची शिवसेना अल्पसंख्याक महिला विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती

September 21, 202113:12 PM 12 0 0

खोपोली – खोपोली शहरात शिवसेना महिलाआघाडी सध्या आपल्या कार्याच्या कक्षा खूप जोमाने वाढवताना दिसत असून काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेशकर्त्या झालेल्या जैबुनीसा शेख यांना अल्पसंख्याक महिला कर्जत विधानसभा अध्यक्ष पदी नियुक्ती आज करण्यात आली. अल्पसंख्याक विभागाचे तसे म्हणायला शिवसेना या पक्षात पद नाही पण कर्जत खालापूर या विधानसभा क्षेत्रात या समाजाच्या अनेक महिला आज शिवसेनेत दाखल होत आहेत व त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्य पुढे नेले जावे या साठी जैबुनीसा शेख यांना हे पद देऊन त्यांना पक्षाच्या मुख्यप्रवाहात घेतले आहे व त्यांच्याप्रमाणेच अनेक मुस्लिम महिला पक्षात येऊन पक्ष आणखीन बळकट करतील असा विश्वास या प्रसंगी जिल्हा संघटक रेखाताई ठाकरे यांनी व्यक्त केला.

जैबुनीसा शेख यांनी काही दिवसांपूर्वी कर्जत येथे झालेल्या मेळाव्यात राज्याचे मंत्री उदय सावंत व आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. जैबुनीसा शेख यांचे सामाजिक कार्य पहाता त्यांना शिवसेनेत कोणत्यातरी पदावर काम करण्याची संधी पक्षाकडून मिळेल हे नक्की होते व आज त्यांना थेट कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रात काम करण्याची संधी शिवसेनेने दिली आहे .जैबुनीसा शेख यांची मुस्लिम समाजात महिलांप्रति खूप आस्था आहे तसेच त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यांनी निर्माण केलेल्या संस्था व बचतगट त्यांच्या सामाजाकी कार्याची पोहचपावती देतात त्यांना दिलेल्या पदाने अनेक मुस्लिम बांधव व महिला शिवसेनेत उघडपणे कार्य करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.जैबुनीसा शेख यांना शिवसेनेच्या कर्जत खालापूर विधझनसभा क्षेत्राचे अध्यक्ष म्हणून पद आज खोपोली शिवसेना कार्यालयात जिल्हासंघटक रेखाताई ठाकरे यांच्याहस्ते देण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्षा विनिता कांबळे , नगरसेविका वनिता काळे तसेच शहरातील महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या. सर्वांनी जैबुनीसा शेख यांना शुभेच्छा दिल्या तर नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले त्यांच्या विभागातील युवानेते मंगेश काळोखे हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते त्यांनी ही जैबुनीसा शेख यांना शुभेच्छा दिल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *