उरण प्रतींनिधी (अश्विनी निलेश धोत्रे) : हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.द्धवसाहेब ठाकरे , युवासेना प्रमुख मा.श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख मा.श्री.दत्ताजी दळवी , रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना पक्षाच्या उरण विधानसभा संपर्कप्रमुख पदी श्री.महादेव घरत यांची नियुक्ती करण्यात आली.
आपण शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणाना अनुसरून वाटचाल करून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी, पक्ष बांधणीसाठी आणि विस्तारासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावे. अशा शुभेच्छा *माजी आमदार मनोहरशेठ भोईर* यांनी यावेळी दिल्या. यावेळी महिला जिल्हा संघटिका रेखाताई ठाकरे, उपतालुकाप्रमुख अमित भगत, शहरप्रमुख मनोज घरत, उपजिल्हासंघटिका ममता पाटील, उरण तालुका महिला संघटिका भावना म्हात्रे, शहर संघटिका मेघा मेस्त्री, उरण संपर्क संघटिका श्रद्धा सावंत, उरण संपर्क संघटिका वंदना पवार, उपशहरसंघटिका माधुरी चव्हाण, शाखाप्रमुख सचिन पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.
Leave a Reply