ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

हिंदू संत सभेच्या जिल्हाध्यक्षपदी मंहंत शास्त्री यांची नियुक्ती

January 28, 202113:24 PM 19 0 0

जालना : धार्मिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले महंत सुदामराज शास्त्री यांची हिंदू संत सभेच्या जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारत हिंदु महासभा प्रणित हिंदु संत सभेच्या जालना जिल्हाध्यक्षपदावर योगेश्‍वर श्रीकृष्ण धर्म पिठाचे महंत सुदामराज शास्त्री यांची अंबड रोडवरील महानुभव आश्रम येथे नियुक्ती पत्र देऊन ही निवड करण्यात आली आहे.

हिंदू महासभेचे युवा नेतृत्व ईश्‍वर बिल्होरे, अशोक भगुरे, शेतकरी नेते बबनराव गवारे, लहुजी शक्ती सेनेचे सचिन क्षिरसागर यांच्या उपस्थितीत हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सुर्यवंशी यांनी ही नियुक्ती केली असून या संदर्भातील निवड पत्रात त्यांनी म्हटले आहे की, संत- महंत भारतीय संस्कृतीची ओळख आहे. विश्‍वस्तरावर भारतीय संस्कृतीला पोहचविण्यासाठी संतानी भूमिका निभावली आहे. हिंदू महासभा भारतातील सर्वात प्रथम संघटनेचे शंकराचार्य, संत- मंहंत क्रांतीकारी देशभक्त व नेतृत्व राजा महाराजांनी केलेले आहे. तोच निस्वार्थी वसा पुढे नेण्यासाठी आपल्या माध्यमातून सातत्य व्हावे व हिंदू धर्मावर देवी- देवतांवर, संत- मंहंतांवर आक्षेपार्ह लिखान व चिंतन करणार्‍यांना सडेतोड उत्तर देण्यासह गौरक्षणासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही या नियुक्तीपत्रात धनसिंह सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या नियुक्तीबद्दल मंहंत सुदामराज शास्त्री यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *