ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अर्जुनराव खोतकर यांचा पुढाकार उत्पादकांना दिलासा जालन्याच्या मोसंबीस मुंबईत मिळेल चांगला भाव :अशोकराव डक

September 27, 202115:46 PM 11 0 0

जालना ( प्रतिनिधी): गोड मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून संपूर्ण भारतात ख्याती असलेल्या जालना जिल्ह्यातील मोसंबीस अधिक चांगला भाव मिळण्यासाठी सभापती अर्जुनराव खोतकर यांनी जागतिक बाजार पेठेचे केंद्र असलेल्या मुंबई बाजार समितीस साद घातली. त्यास मुंबई बाजार समिती ने अनुकूलता दर्शवली असून येथील मोसंबीस अधिक चांगला भाव मिळेल. अशी माहिती मुंबई बाजार समिती चे सभापती अशोकराव डक यांनी आज दिली.

जालना बाजार समितीस रविवारी ( ता. 29)मुंबई बाजार समिती चे सभापती अशोकराव डक व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी भेट देऊन मोसंबी उत्पादक शेतक री आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला .यावेळी शरद कोळके, वैभव क्षीरसागर, युवा नेते संजय खोतकर, सचिव रजनीकांत इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अशोकराव डक म्हणाले, जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मोसंबी उत्पादक शेतकरी असून त्यांच्या मालाला मुंबईत अधिक चांगला भाव मिळण्यासाठी शिवसेना नेते तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अर्जुनराव खोतकर यांनी आपल्या कडे मागणी केली होती.असे सांगून येथील मोसंबीस जी. आय. मानांकन प्राप्त असल्याने अंतरराष्ट्रीय बाजार पेठेत मोठी मागणी वाढेल. असा विश्वास अशोकराव डक यांनी मोसंबी उत्पादकांना दिला.
बाजार समिती तर्फे युवा नेते संजय खोतकर यांनी श्री. डक यांचा सत्कार केला. या वेळी संचालक अनिल सोनी, तुळशीराम काळे, सुभाष बोडखे,कर्मचारी मोहन राठोड, अनिल खंडाळे, भगवान शिंदे, नाथा पाटील घनघाव, शमीम, मुकेश महाजन, विष्णु हळगे, माऊली खांडेकर, नजीर, अक्रम , इरफान डायमंड, मोसंबी उत्पादक शेतकरी आत्माराम नानोटे, अशोक गायकवाड, अशोक एखंडे, मिलिंद कुळकर्णी, चव्हाण , शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *