जालना (प्रतिनिधी)ः जालना येथील उद्योजक राजेश सोनी यांचे अपहरण करुन त्यांच्याकडून दोन कोटी रुपये खंडणी वसुल करण्याचा प्रयत्न करणार्या पाच आरोपींच्या जालना स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातुन एक इरटीका कार, दोन गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत.या संर्भात थोडक्यात माहिती अशी की, जालना येथील राजेश भगवानदास सोनी प्रसिध्द धार्मीक स्थळ असलेले दत्ताश्रम येथे दर्शनासाठी गेले होते. त्यांना आडवून त्यांचे अपहरण करुन त्यांच्याकडून दोन कोटी रुपये खंडणी उकळण्याचा आरोपीचा बेत होता. परंतु सोनी यांनी आपली कसीबसी सुटका करुन घेत दत्ताश्रमात घूसले. यावेळी पोलीसांनी माहिती देण्यात आली.
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत राजेश सोनी यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात तपास सुरु होता. या घटनेचा गांभीर्याने विचार करुन पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांनी या घटनेचा तपास स्थानीक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. वरीष्ठांच्या सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. सुभाष भुजंग, स.पो.नि. शिवाजी नागवे यांच्यासह पो.उप नि. दुर्गेश राजपुत, सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, देविदास भोजणे, विलास चेके, संदिप मांटे, सुरज साठे यांनी मेहनतीने तपास करुन आरोपीचा वेगवेगळ्या जागेवरुन शोध घेतला. व संशयीत आरोपी म्हणून राजेंद्र बाबासाहेब राऊत ऊर्फ राजन बाबुराव मुजमुले, वय 26 वर्षे, रा.परतुर जि.जालना., विशाल संजय जोगदंड, वय 20 वर्षे, व्यवसाय मजुरी. रा. जोगदंड मळा, महेंद्र शोरुमच्या पाठीमागे, जालना., भागवत ऊर्फ संभ्या बालाजी राऊत, वय 20 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. महंद्र शोरुमच्या पाठीमागे, वैद्यचा मळा, औरंगाबाद रोड जालना., पांडुरंग ऊर्फ ओम बबन वैद्य, वय 24 वर्षे, व्यवसाव मजुरी रा. महद्र शोरुमच्या पाटीमागे, वैद्यचा मळा, औरंगाबाद रोड जालना., मोहम्मद इरफान मलीक रा. पडेगाव कासमवली दर्गा, औरंगावाद यांना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.
आरोपींनी पोलीस तपासात दिलेल्या माहिती प्रमाणे त्यांनी पुण्यातुन एक इरटीका कार भाड्याने घेऊन ड्रायव्हरचे हातपाय बांधून गाडीखाली काढले व गाडची नंबरप्लेट काढून गाडी चोरुन नेली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी राजेश सोनी यांना गावठी कट्याचा धाक दाखवून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला.अशी कबुली आरोपीकडून देण्यात आली असून आरोपीतांकडुन गुन्हयात वापरलेले दोन गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुस, एक चारचाकी वाहन (इरटिगा कार), व एक खंजर असा एकुण 12,35,500/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. असी अप्पर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Leave a Reply