ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रोटरी क्लब जालना मिडटाऊनच्या मानद सदस्यपदी मा. जिल्हाधिकारी श्री विजय राठोड

February 17, 202213:07 PM 32 0 0

रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनच्या मानद सदस्यपदी मा. जिल्हाधिकारी श्री विजय राठोड यांना देण्यात आलेले आहे. रोटरीच्या मानद सदस्यपदी पालकमंत्री श्री राजेशभैय्या टोपे, पोलीस अधिक्षक श्री विनायक देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदल सुध्दा आहे. तसेच श्री रविंद्र बिनवडे माजी जिल्हाधिकारी जालना हे सुध्दा रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे मानद सदस्य आहेत. सदर मानद सदस्यपद रोटरी इंटरनॅशनलतर्फे समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या लोकांना दिले जाते व यामध्ये इंग्लड, अमेरीका मधील राष्ट्रीय अध्यक्षांना रोटरी तर्फे मानद सदस्य दिले गेलेले आहे.
संस्थापक अध्यक्ष पंकज पाटणी, मनमोहन भक्कड, दिनेश छाजेड, डॉ. अनुप करवा, सुरज गेही, अॅड. महेश धन्नावत या सर्व अध्यक्षांच्या कार्यकाळात झालेल्या व कार्यान्वीत असलेल्या विविध सामाजीक कार्य जसे मीया वाकी, नैर्सगीक ऑक्सीजन प्लांट, मेडीकल कॅम्प, सिध्दु शुध्द पाणी प्रकल्प, घन कचरा व्यवस्थापन, ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर मशीन, शुध्द पाणी, ब्लड डोनेशन, मुलींचे शिक्षण ईत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यानेच जगभरात जालना रोटरीचा नावलौकीक झालेले आहे.
शासनासोबत जनहितात रोटरी मिडटाऊन सदैव कार्यान्वीत असते. मानद सदस्य पद मा. जिल्हाधिकारी श्री विजय राठोड यांना रोटरी पिन संचालक श्री विरेश बगडीया, अमित अग्रवाल, रोटॅक्टर इंजिनियर रवि भक्कड, रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे अध्यक्ष अॅड. महेश धन्नावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
डॉ. विजय राठोड यांनी सुध्दा समाजाला आपले देणे लागते या भावनेनेच कार्य करावे व समाजाचे आभारी रहावे की, त्यांनी आपल्याला कार्य करण्याची संधी दिली. तसेच एन.जी.ओ. यांचा हे कर्तव्य आहे की, त्यांनी शासन जेथे समाजासाठी कमी पडतो तेथे त्यांनी कार्य करावे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *