ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लग्नाला दिला नकार म्हणून तरूणीला धावत्या लोकलसमोर ढकललं

February 21, 202114:04 PM 100 0 0

रागाच्या भरात माणूस काय करेल सांगता येत नाही. रागातूनच अनेकदा जीवघेण्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना मुंबईतील लोकल रेल्वेत घडली. लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने २१ वर्षीय तरुणीला धावत्या लोकलसमोर ढकलून दिलं. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तब्बल १२ टाके लागले आहेत. खार रेल्वेस्थानकावर ही घटना घडली असून, हा शहारा आणणारा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जखमी झालेली तरुणी आणि तिला धक्का देणारा तरुण दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ते दोघेही एकाच ठिकाणी काम करायचे. दोघांमध्ये चांगले मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. मात्र, त्यानंतर आरोपी तरुणाला दारूचं व्यसन असल्याचं तरुणीला कळालं. ही गोष्ट कळाल्यानंतर तरुणी त्यांच्यापासून अंतर ठेवून राहू लागली. मात्र, तो तरुणीला त्रास देऊ लागला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तक्रारही केली होती. मात्र, तरीही त्याचं त्रास देणं सुरूच होतं.

मुंबईतील खार रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. सुमेध जाधव असं आरोपी तरुणाचं नाव असून, तो वडाळा येथील रहिवासी आहे. तर तरुणी खार येथील रहिवासी आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमेध तिचा पाठलाग करत होता. पाठलाग करतच अंधेरी रेल्वे स्थानकावरून तो लोकलमध्ये चढला. त्यानंतर तरुणीने तिच्या आईला फोन करत मदत मागितली. रेल्वे स्टेशनवर तरुणी आईला भेटली. त्यानंतरही आरोपी तिचा पाठलाग करतच होता. तिथेच त्याने लग्नाचा प्रस्ताव दिला. मात्र, तरुणीने तो फेटाळून लावला.
लग्नाला नकार दिल्यानंतर सुमेधनं स्वतःला संपवण्याची धमकी दिली. रेल्व स्थानकात येणाऱ्या गाडीच्या दिशेनं तो धावत सुटला, पण अचानक थांबला आणि पुन्हा परत आला. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने पकडलं आणि लोकलच्या दिशेनं घेऊन गेला. रेल्वे स्थानकातून सुटल्यानंतर त्याने तरूणीला प्लॅटफॉर्म आणि धावत्या रेल्वेच्या मध्ये ढकललं. तरुणीच्या आईने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तरुणीच्या डोक्याला जबर मार बसला. जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला १२ टाके पडले आहेत. पोलिसांनी आरोपीला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *