जालना ः मराठा सेवा संघाची एक बैठक रविवारी (ता.१७) भाग्यनगर येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत मराठा सेवा संघाच्या शहराध्यक्षपदी प्रा. डॉ. प्रशांत तेलगड यांची सर्वोनुमते निवड करण्यात आली.
या प्रसंगी मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुनराव तनपुरे, प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे, जिल्हाध्यक्ष संदीपान जाधव, जिल्हा सचिव काकासाहेब खरात, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. सोपानराव तेलगड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी शहराउपाध्यक्षपदी प्रा. नरसिंग पवार, रघुनाथ खरात, जिल्हा सहसचिवपदी संदीप इंगळे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमाेल चव्हाण यांनी केले तर संदिप इंगळे यांनी आभार मानले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे भरत मानकर, निवृत्ती कृषी अधिकारी मदन कोरडे, मधुकर उबाळे, इंजि. नयन नन्नवरे, इंजि. विनोद कुमकर, अभय पवार, सुमित लोखंडे, वैभव पाटील, कृष्णा शेळके, प्रसाद वाढेकर,दत्ता मते, ॲड. गोपाल मोरे,ॲड. भारत बेंद्रे, ॲड. मनिष राऊत, शुभम टेकाळे, प्रा. डॉ. सर्जेराव ताठे, प्रा. डॉ. दिलीप फोके, सर्जेराव थोरात, सुभाष काकडे, राहूल पोहेकर आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply