अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीसाठीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य संयुक्त चिटणीस डॉ. रवींद्र काकडे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून म.नईम म.बशीर, विजय खरात,सीमा काकडे,नसीम शेख,कल्पना खंडागळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सीमा काकडे यांनी संघटनेने मागील काळात केलेल्या कामाचा आढावा दिला.त्यानंतर निवड प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष पदी डॉ.रवींद्र काकडे यांची तर जिल्हा सरचिटणीस म्हणून सुखदेव चव्हाण, कार्याध्यक्षपदी विष्णू वाघमारे, जिल्हा नेतेपदी म. नईम म.बशीर, विजय खरात,नसीम शेख संतोष बोर्डे यांची निवड करण्यात आली.महिला विंगच्या जिल्हाध्यक्षपदी सीमा काकडे तर सरचिटणीसपदी नूतन मघाडे यांची निवड करण्यात आली.यानंतर काही तालुक्यांच्या अध्यक्षांची सदरील बैठकीत नियुक्ती करण्यात आलेली आहे.
जालना तालुका तालुकाध्यक्षपदी गौतम गवई. बदनापुर तालुकाध्यक्षपदी अरुण हिवाळे,जाफराबाद तालुकाध्यक्षपदी नसीम शेख, घनसांवगी तालुकाध्यक्षपदी संजय खरात, परतुर तालुका अध्यक्षपदी बाबासाहेब भापकर सरचिटणीस पदी सुरेश तोटे, मंठा तालुकाध्यक्षपदी संदीप इंगोले यांची निवड करण्यात आली. महिलांच्या जालना तालुकाध्यक्षपदी वैशाली देशमुख तर सचिवपदी सुनिता चव्हाण यांची निवड करण्यात आली. बदनापुर तालुका सरचिटणीसपदी संध्या कानडे यांची निवड करण्यात आली. अंबड तालुकाध्यक्षपदी श्रीदेवी सूर्यवंशी यांची तर सरचिटणीस पदी सुनिता गायकवाड घनसावंगी तालुकाध्यक्षपदी अर्चना गुंगे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षिय समारोपामध्ये डॉ.रवींद्र काकडे यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी संघटना सदैव तत्पर राहील असे आश्वासन दिले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून संघाच्यावतीने विविध फाउंडेशनच्या वतीने घोषित झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार मानकरी शिक्षक बांधवांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यामध्ये कल्पना खंडागळे,सुनील भालतिलक,सुखदेव चव्हाण,युवराज पडिभार,अर्चना गुंगे, नित्या मनवर या आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे अखिल महिला विंगच्यावतीने 8 मार्च महिला दिनानिमित्त ऑनलाइन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धक महिला शिक्षकांचा याप्रसंगी पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,काव्यवाचन स्पर्धा यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा चाटुफळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नुतन मघाडे यांनी मानले.
कार्यक्रमामध्ये सर्वस्वी सुनील भालतिलक, भानुदास लोखंडे, सोमनाथ पांगारकर विठ्ठल मुंढे,भारत, दांडेकर,प्रभाकर मुळे,नामदेव सुतार, जितेंद्र कांबळे,राजेश रेड्डी,सचिन सुरडकर,विजय सदावर्ते,विकास सोनुने,संदीप गवई, सतीश बोर्डे,विनोद पैठणे, भाऊसाहेब बो-हाडे, दत्ता मुनेमानीक, संजय निकम,सुरेश तोटे,राधेशाम दायमा,अमोल आखाडे,सारिका जमधाडे,डॉ.रेखा कलवले,दिक्षा बोर्डे, विजया आढे,जयश्री आढे,हर्षाली पाटील,ज्योती वाघ, प्रदीप घाटेशाही, गणेश भुतेकर, संजय भवर,संतोष चव्हाण,संग्राम बसवे, सुनील अचलखांब, युवराज पडिभार,उज्वला जाधव,संजय वाघमारे,सिद्धार्थ वाघमारे,प्रशांत थोरात,सुनील अंभोरे,सुरेश बोर्डे, सोमनाथ उदेवाळ, राजेश लोखंडे, संगिता नाईक,रेखा गतखणे,पंचशीला वाघमारे,प्रज्ञा हिवाळे,एस. पि. जाधव,एन.आर. जाधव,सीमा ओमकार,सुरेखा साठे, एस व्हि सुरडकर, नित्या मनवर,चित्रा घोरपडे, मीनाक्षी लालसरे,पि.व्हि. मोरे, प्रकाश बंड, सुभाष मोरे,पराग डिक्कर आदींसह जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची या कार्यक्रमास उपस्थिती होती.
Leave a Reply