ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राष्ट्रीय- राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. हेमंत कार्ले यांची तर सचिवपदी गणेश जाधव यांची निवड

December 6, 202115:48 PM 60 0 0

नांदेड – राष्ट्रीय – राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य शाखा नांदेडची कार्यकारिणी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांनी नुकतीच जाहीर केली. जिल्हाध्यक्षपदी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. हेमंत कार्ले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. राष्ट्रीय -राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. यावेळी नांदेड जिल्हा शाखेचे कार्यकारणी पुढील प्रमाणे निवडण्यात आली.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील अलुरकर यांची उपाध्यक्षपदी, जिल्हा सरचिटणीस म्हणून गणेश जाधव यांची तर कार्याध्यक्ष म्हणून रमेश मुनेश्वर यांची निवड करण्यात आली. डॉ. शेख एम. एच. डब्ल्यू. हे सल्लागार म्हणून काम पाहतील. उर्वरित कार्यकारणी दुसऱ्या बैठकीत करण्याची जबाबदारी राज्याध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्षावर सोपविली.
यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी, देविदास तारू, सिराज अनवर, विजय गादेवार, गंगाधर वाघमारे, रामा उईके, आसाराम चव्हाण, शालिनी सेलूकर, श्रीमती मीना आदी राष्ट्रीय – राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षीका उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी या नोंदणीकृत संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *