जालना (प्रतिनिधी) ः जालना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी ममदाबाद येथील डॉ. सय्यद लाल यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
यासंदर्भात देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, जालना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या तालुकाध्यक्ष पदावर डॉ. सय्यद लाल यांची फेर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय-धोरण आणि राष्ट्रीय नेते तथा संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांची वैचारिक भूमिका लक्षात घेऊन त्याच्या प्रचार व प्रसारासाठी आणि राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली आपण आपल्या भागामध्ये पक्ष संघटन वाढविण्यासाठी – कटीबध्द व्हावे. तसेच आपल्या विचारांची नव्या-जुन्या पिढीतील तसेच सर्व समाज घटकातील अधिकाधिक माणसे जोडावित. सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सकारात्मक निवडणूक रणनिती आखावी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच आगामी काळात होणाऱ्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी काम करावे. जनहिताच्या दृष्टीकोनातून पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रम उपक्रमाचे आपल्या पातळीवर नियोजन करुन ते सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या राबवावेत व त्यासंबंधीचा अहवाल वेळोवेळी जिल्हा राष्ट्रवादी कमिटीकडे पाठविण्याची व्यवस्था करावी.
या निवडीबद्दल दिलीपराव भुतेकर, भगवानराव (नाना) डोंगरे, गणेश कदम, सोपान पाडमुख, भगवानराव घाटुळ, अशोकराव देशमुख, आंबादास शिंदे सर, रमेश जोशी, राजाभाऊ उजड, भगवानराव नाईकनवरे, रामदास म्हस्के, पांडुरंग उबाळे, तात्यासाहेब सराटे, हनुमंत इंगळे, शिवाजीराव खेडेकर, धनंजय मोहीते, संदीप देशमुख, महादेव खांडेभराड, गणेश म्हस्के, मुजफर पठाण, मुक्तीराव शिंगाडे, रंगनाथ नांगरे, रमेश शिंदे, कैलास वाहुळकर, विनोद देशमुख आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
Leave a Reply