ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पहाटे कामावर जाणाऱ्या व्यक्तीचा निर्घृण खून, लुटीचा संशय

March 1, 202114:40 PM 66 0 0

नालासोपारा : नालासोपाऱ्यात आज पहाटे कामावर जाणाऱ्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. धारदार हत्याराने वार करुन त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे कैलास पाठक असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कैलास पाठक आज (1 मार्च) सकाळी साडे चार वाजता मुंबईला कामावर जाण्यासाठी घरातून निघाला होता. मात्र, घरापासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तींनी चाकूने वार करुन त्याची निर्घृण हत्या केली आहे.

मृत कैलास पाठक हा पार्ले येथे सुरक्षारक्षकाच काम करायचा. तो नालासोपाऱ्यात आपल्या घरी आठवड्यातून एकदा यायचा. त्याचे कुणाबरोबरही वैर नसल्याचं त्याची वहिनी कीनू पाठक यांनी सांगितलं आहे. मात्र, पहाटे साडे चार-पाचच्या दरम्यान त्याची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणालाही कळालं नाही. मात्र, सकाळी सात वाजता आजू बाजूच्यांनी घरच्यांना या घटनेबाबत कळवलं.

पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ही हत्या लुटीच्या उद्देशातून झाली की, दुसऱ्या कुठल्या कारणावरुन झाला याचा पेलीस शोध घेत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *