ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पिरपिंपळगाव आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्‍या आशा स्वयंसेविकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

January 22, 202120:22 PM 124 0 0

जालना (प्रतिनिधी) ः कोविड 19 या जागतिक महामारीमध्ये सामाजिक जाणिवेतून अहोरात्र आरोग्यसेवा दिल्याबद्दल जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रातील आशा स्वंयसेविकांना तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

जालना तालुक्यातील पीरपिंपळगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात आज शुक्रवार ता. 22 रोजी मासिक सभा घेण्यात आली. या मिटींगमध्ये कोरोना काळात अहोरात्र जिवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देणार्‍या आशा स्वंयसेविकांना पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. मिर्झा बेग यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र वितरित करण्यात आले. यावेळी एलएचव्ही गिर्‍हे, फार्मसी अधिकारी ढिलपे, राणी पोतराजे, गटप्रवर्तक दीपा रगडे आदींची उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यात येत्या 31 जानेवारी रोजी 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. नियोजित 17 जानेवारीला होणारी ही लसीकरण मोहीम कोरोना लसीकरणामुळे पुढे ढकलण्यात आली होती. केंद्र शासनाच्या निर्देशावरून येत्या 31 जानेवारीला मोहीम राबवण्यात येणार असून पीरपिंपळगाव आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्‍या गावातील एकही बालक या मोहीमेपासून वंचीत राहणार नाही कोरोनाचे नियम पाळुन, गर्दी न करता मोहीम यशस्वी करावी असे आदेशही वैद्यकिय अधिकारी डॉ. बेग यांनी दिले.
यावेळी आशा स्वंयसेविका शारदा कांबळे, भारती जोगदंड, मिरा शेळके, राणी गव्हाड, लता गुडंलकर, शोभा सोनवणे, वर्षा?ढगे, संध्या दाभाडे, सविता इर्शिद, तुळसा गायके, सत्यभामा गोरे, संगिता पगडे, रेनुका गिराम, मंदाकीनी नागरे, अलका वाघ, अलका खरात, सुनिता कांबेळे, भारती बारवकर, माया गायकवाड, सुरेखा आचलखांब, कौसर पठाण, नंदीनी मिसाळ, पद्मावती लष्कर, संगिता गिराम, शारदा वाढेकर, लता जुंबड, अनिता जायंभाय, जिजा गाडेकर, रेखा गाडेकर, उषा शिंगणे, सुनिता जाधव, संगिता दाभाडे, कुशीवर्ता शेवाळे, कावेरी अंभोरे, जमुना खरात, मथुरा कचरे, वैशाली वैद्य, शंकुतला खडके, वर्षा लहाने आदीं आशा सेविकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *