ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आषाढी वारीची प्रथा,परंपरा खंडीत होणार नाही- ह.भ.प. योगीराज महाराज लोखंडे

June 27, 202114:16 PM 11 0 0

जालना/प्रतिनिधी शासनाच्या नियमानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपुर आषाढी वारी करणार असल्याची माहिती ह.भ.प. योगीराज महाराज लोखंडे यांनी दिली. श्रीक्षेत्र पंढरपुर वारीचा नियम पताका, टाळ, विना, चिपुळ्या व जयघोष ज्ञानेबा, तुकोबा, भानुदास, एकनाथ, नामेदव, जनाबाई , श्री विठोबा रूख्माई व प्रर्दक्षणा, चंद्रभागा स्नान, हरिकथा, किर्तन, भजन, जागर, काकडा, हरिपाठ, पंचपती, नाम जप असे आहेत.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

जालना येथून श्रीक्षेत्रआळंदी, श्रीक्षेत्रआळंदी येथून श्रीक्षेत्रपंढरपुर येथे माऊलीच्या समाधीच्या सोहळयासाठी पायी वारी सन 2001 पासून सुरू करण्यात आली. त्यामध्ये पायी वारकर्‍यांना राहणे, खाणे, ये-जाण्याची मोफत व्यवस्था ह.भ.प. योगीराज महाराज लोखंडे हे करीत आहे. यावर्षीही परंपरा खंडीत न करता वारी करणार असल्याची माहितीही ह.भ.प. योगीराज महाराज लोखंडे यांनी दिली.

या वारीसाठी जालना शहर व जिल्ह्यातील भाविक-भक्तांनी सहकार्य केले असून, त्यामध्ये आ. कैलाश गोरंट्याल, अप्पासाहेब चव्हाण, मा.आ. अरविंदराव चव्हाण,जालना पालिकेचे माजी उपाध्यक्ष खुशालसिंह ठाकुर, बजरंग भक्कड, संजय भरतीया,राजेंद्र भक्कड, मनोहर सिनगारे, गोपिकशन अग्रवाल, बाबुराव व्यवहारे, अंकुश इंगळे, डॉ.अनिल झंवर, प्रविण मोहता, पुरूषोत्तम तोष्णीवाल, कैलाश लोया, सुभाषचंद्र देविदान, अनिल सोनी, सिए गोविंदप्रसाद मुंदडा, रमेश तोतला, जालना मर्चन्ट बँकेचे अध्यक्ष अंकुश राऊत, प्रकाश मालपाणी,सतिश पंच, बबलु सारस्वत, डॉ. सुरेश साबु, अरूण अग्रवाल, गोवर्धन अग्रवाल, डॉ. श्रीमंत मिसाळ, अशोक पांगारकर, हरिओम लोखंडे, विठोबा लोखंडे, गणेश दांडाईत, जगदीश सिंधी, शिवरतन मुंदडा, विजय कनुजे, कैलासचंद भनानी, सिए गोपाल अग्रवाल यांचा समावेश आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *