ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आश्लेषा बारसिंग हिची कला क्षेत्रात उंच भरारी

October 23, 202114:53 PM 11 0 0

सातारा (विदया निकाळजे) :  स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशन सातारा,पुणे.संचालक स्वप्निल पुराणिक यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जर्मनी, बहरीन, ऑस्ट्रेलिया,आफ्रिका, पाकिस्तान, कॅलिफोर्निया, मलेशिया इत्यादी जगभरातील मराठी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.


यात आंतरराष्ट्रीय स्तरावर एकपात्री प्रयोगाचेही आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत कु.आश्लेषा अविनाश बारसिंग (वयोगट ५-१५) हिने आपला कलाविष्कार सादर करून द्वितीय क्रमांक पटकावल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अभिनेत्री श्रुती पुराणिक,प्रमुख अतिथी म्हणून हास्यजत्रा फेम ओंकार भोजने तर मुख्य अतिथी म्हणून सौ.विशाखा सुभेदार तसेच अध्यक्ष म्हणून मा.अर्जुन पुतलाजी (मराठी सांस्कृतिक केंद्राचे चेअरमन,मॉरिशस) यांची उपस्थिती लाभली. कु.आश्लेषा ही नवोदय विद्यालयाची अष्टपैलू विद्यार्थिनी आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *