जालना (प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा न.प.गट नेते अशोक अन्ना पांगारकर यांची निवड प्रदेश अध्यक्ष आण्णासाहेब जयदत्त क्षीरसागर यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे केली आहे.
दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा आर्शिवाद घेऊन राज्यभरात तेली समाज संघटन अत्यंत प्रभावीपणे उभे करण्याच्या संदर्भातील जबाबदारी आपल्यावर आली असून आपण तेली समाजाला सामाजिक,राजकीय,आर्थिक व शैक्षणिकदृष्टया संपन्न करण्याच्या दृष्टीकोणातून आपण प्रयत्न करावा असे म्हटले आहे. अशोक पांगारकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Leave a Reply