ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण नगरपरिषद मार्फत ने पूरग्रस्तांसाठी मदत

July 24, 202114:01 PM 23 0 0

उरण (संगिता पवार ) महाड तालुक्यात तुफान पाऊस पडला मुसळधार पावसामुळे सावित्री ,गांधारी ,आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी औधोगिक परिसरात प्रवेश केला या मुळे पूरस्थिती निमण झाली परिणामी शहरातील बैठ्या घरांत आणिदुकानंत पाणी शिरले . महाड मधील पूरग्रस्तांसाठी उरण नगरपरिषद ने महाड पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा हात दिला .

शुक्रवार (दि. २३ ) रोजी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे ,उपनगराध्यक्ष जयविन कोळी , नगरसेवक कौशिक शाह ,,मुख्याधिकारी संतोष माळी ,,सविन म्हात्रे नगरसेवक राजेश ठाकूर ,,आणि सर्व नगरसेवक ,नगरसेविका ,उरण नगरपरिषदेतील सर्व विभाग प्रमुख ,कर्मचारी ,,उरण शहरातील दानशूर व्यक्ती ,आदींनी मदत केली . साड्या १०० ,टॉवेल ५० , मॅक्सी (गाऊन )१०० ,परकर १०० , टी शर्ट ५०, टॅक पॅन्ट १० ,बेडशीट व चादर ३०० ,व इतर कपडे १००० ,तांदुळ ,बिस्कीट आदी जीवनावश्यक वस्तू टेम्पो मध्ये पाठविण्यात आला .सदर वस्तू उरण नगरपरिषद मध्ये जमा करून माणगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.तेथुन जिथे जरुरी आहे तिथे पाठविण्यात येणार आहे .
या वेळी उरण नगराध्यक्ष सायली म्हात्रे ,उपनगराध्यक्ष जयविन कोळी ,भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,मुख्याधिकारी संतोष माळी ,नगरसेवक राजेश ठाकूर ,माजी नगरसेवक नवीन राजपाल,सविन म्हात्रे ,नगर अभियंता अनुप कुमार कांबळे , कनिष्ठ अभियंता झुंबर माने , आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, जगदीश म्हात्रे, सहाय्यक नगर रचनाकार सचिन भानुसे , कर निर्धारण अधिकारी मोनिका शिरसाट ,संघनकअभियंता धनंजय थोरात ,मालमत्ता पर्यवेक्षक कोमल नलावडे , ,अनिल कासारे ,धनुश कासारे , सर्व कर्मचारी ,अधिकारी ,व सफाई कामगार आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *