ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

डिवायएसपी खिरवडकर व पीआय महाजन विरोधात गुन्हा नोंदवा पोलिस अधिक्षकांकडून आश्‍वासन; भीम आर्मीचे उपोषण तुर्त मागे

June 8, 202116:06 PM 4 0 0

जालना/प्रतिनिधी जालना येथील शिवराज नारियलवाले मारझोड प्रकरणात जालना उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरवडकर व पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या विरोधात भादंवि कलम 307 चा गुन्हा नोंद करून, त्यांना निलंबीत करावे, या मागणीसाठी भीम आर्मीच्या वतीने 7 जून रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर व इतर पदाधिकार्‍यांनी पाणी पिवून उपोषण मागे घेतले.


भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. 9 एप्रिल रोजी जालना येथील दिपक हॉस्पीटल येथे डिवायएसपी खिरवडकर, पो.नि. महाजन व इतर पोलिसांनी अमानुषपणे मारझोड केली. मारझोड करणार्‍या पोलिसांविरोधात भादंवि कलम 307 अन्वये गुन्हा नोंदवावा, त्यांना निलंबीत करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी स्वतः भीम आर्मीच्या शिष्टमंडळास बोलावून, चर्चा केली. मारझोड प्रकरणातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविलेला आहे. अहवाल येताच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर भीम आर्मीच्या वतीने उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणाच्या वेळी संपर्कप्रमुख पाटील मोरे, तालुकाप्रमुख सुनील पाडमुख , शहरप्रमुख शहर प्रमुख रवी ढाकणे , अशोक झिने , बुद्धिवंत पाडमुख, बाबासाहेब धोंगडे,रामा मोरे,दीपक मोर यांच्यासह भीम आर्मीचे पदाधिकारी, कार्यकर्ते होते..
यावेळी पो.नि. टाक, डीएसबी शाखेचे सय्यद, एम.यु. पठाण, वामन दांडगे यांच्यासह 2 पोलिस निरीक्षक 33 पोलिस कर्मचार्‍यांचा मोठा बंदोबस्त होता.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *