जालना (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना निवड श्रेणीसह वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाकडून सातत्याने आश्वासनाची खैरात दिली जात आहे. यामुळे शिक्षक वर्तुळात तीव्र नाराजी निर्माण झाली असून याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून या प्रश्नासह अन्य प्रलंबीत प्रकरणे त्वरीत मार्गी लावावित अशी अग्रही मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा शाखेच्या शिष्ट मंडळाने आज शुक्रवारी प्राथमिक शिक्षण अधिकारी कैलास दातखीळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न दिर्घ काळापासून प्रलंबीत आहेत. त्यात प्रामुख्याने पात्र असलेल्या शिक्षकांना निवड श्रेणी वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ तात्काळ देण्यात यावा. प्राथमिक शिक्षकांमधून पात्रतेनूसार केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व प्राथमिक पदविधर यांची पदे तात्काळ भरण्यात यावी, वैद्यकीय परिपुर्ती व इतर देयकांसाठी निधीची तरतूद करून सर्व देयक मार्च पुर्वी अदा करण्यात यावी, डिसीपीएस योजना एनपीएस करण्याआधी डिसीपीएसचा पुर्ण हिशोब देण्यात यावा, न्यायालयाने निकाली काढलेल्या आदर्श शिक्षकांच्या आगाऊ वेतनवाढी तात्काळ देण्यात याव्या, न्यायालयाच्या आदेशानुसार इतर जिल्ह्याप्रमाणे जालना जिल्ह्यातील विषय शिक्षकांना सरसगट 4300/- ग्रेट पे व पदविधर वेतन श्रेणी पुर्ववत देण्यात यावी इत्यादी मागण्यांचा समावेश आहेे. प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री दातखीळ यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करतांना निवडश्रेणी/वेतनश्रेणी पात्र शिक्षकांचे प्रस्ताव मागवण्याबाबत लवकरच पत्र काढुन प्रस्ताव मागवण्यात येतील असे आश्वासन देऊन वरीष्ट वेतन श्रेणी व निवड श्रेणी संदर्भातील प्रक्रीया अंतिम टप्प्यात असल्याचे दातखीळ यांनी सांगीतले. शिक्षकांच्या प्रलंबित वैद्यकिय बिलाबाबत निधीची मागणी करण्यात आलेली असून येत्या मार्च अखेरपर्यंत आर्थीक तरतूद प्राप्त होताच हा प्रश्न देखील निकाली काढला जाईल अशी ग्वाही श्री दातखीळ यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळातील पदाधिकार्यांना दिली. संघाचे प्रदेश उपाध्यक्ष उत्तम वायाळ, जिल्हा नेते अजहर पठाण, जिल्हाध्यक्ष भगवान भालके, सरचिटणीस शांतीलाल गोरे, कार्याध्यक्ष उद्धव खांडेभराड, संपर्क प्रमुख वसंत शेवाळे, प्रकाश शहाणे, कार्यकारी अध्यक्ष आण्णा इंगळे, कोषाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात विजय चित्ते, बालाजी परतवाड, शेख रिजवान, दिनकर डोके, प्रमोद बिडकर, शिवाजी चव्हाण, दिपक चव्हाण, बबन जंजाळ, शिवानंद खरात, मुक्ताराम खरात, प्रदीप इंगळे, विलास खैरे, सोपान पाष्टे, हरीभाऊ वायसे, शशीकांत कावळे, राजेश लामगे, विजय यादव, सचिन सोनटक्के, बी. एम. गायकवाड, किशोर धनवई, राम चव्हाळ, लक्ष्मण मोरे, एम. बी. शिंदे आदी पदाधिकार्यांचा समावेश होता.
Leave a Reply