ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अष्टभुजा हिरकणीच्या विविध उपक्रमांना सहकार्य करू सरपंच शरद मदने यांचे प्रकाशन प्रसंगी आश्वासन

November 10, 202116:59 PM 16 0 0

हिरकणी टीम

फलटण  : “अष्टभुजा हिरकणीच्या विविध उपक्रमांना सहकार्य करू”असे आश्वासन गिरवी ता फलटण ग्रामपंचायतीचे सरपंच श्री शरद मेघा मदने यांनी दिले. अष्टभुजा हिरकणीच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी श्री मदने बोलत होते. श्री मदने पुढे म्हणाले की,”अष्टभुजा च्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना आणाव्यात आणि ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात,यासाठी ग्रामपंचायत सहकार्य करण्यास कटीबद्ध राहील. कार्यक्रमास श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक,श्री शिवराज कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ग्रामीण भागातील सुशिक्षित महिलांना शेअर बाजार, आर्थिक उलाढाली, बँकिंग व्यवहार याबद्दल प्रशिक्षणाची गरज असून असे प्रशिक्षण आयोजित करावे अशी मागणी श्री शिवराज कदम यांनी केली. ग्रामपंचायत सदस्य संजय हरी मदने यांनी गावातील होतकरू मुलींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना ,नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अष्टभुजा हिरकणीच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी हिरकणीच्या कार्यकारी संपादक विदया सुरजकुमार निकाळजे यांनी अष्टभुजा हिरकणीच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. तसेच अष्टभुजाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची कामाची माहिती दिली.
कार्यक्रमास प्लँटो कृषी तंत्र सेवा चे मालक श्री राजेंद्र कदम,ग्रामविकास अधिकारी रमेश चिमाजी साळुंखे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत लिपिक संदीप निकाळजे, विकी मोहिते,स्वप्नील निकाळजे यांनी विशेष सहकार्य केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *