जालना/प्रतिनिधी दमा व बालदम्याचे वेळीच निदान व उपचार केल्यास हा रोग बरा होवू शकतो असे प्रतिपादन छाबडा हॉस्पीटलचे संचालक डॉ. धिरज छाबडा यांनी केले. जालना येथील मोदीखाना स्थित छाबडा हॉस्पीटल व लॉयन्स क्लब ऑफ जालना मर्चन्ट सिटीच्या वतीने छाबडा हॉस्पीटलच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत दमा व बालदमा शिबीर नुकतेच संपन्न झाले.
शिबीराचे उद्घाटन लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांनी केले. यावेळी लॉ. रामकॅुंवर अग्रवाल,झोन चेअर पर्सन लॉ. विनोद कुमावत, माजी प्रांतपाल विजय बगडिया, क्लबचे अध्यक्ष विनोद पवार आदिंची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ. धिरज छाबडा म्हणाले की,दररोज श्वासावाटे अदृश्य कण आपल्या संपर्कात येत असतात. त्यामध्ये काहींना यापैकी एक किंवा अनेक गोष्टींची अॅलर्जी निर्माण होऊन खोकला,छाती भरते, बंद खोलीत गुदमरायला होतं. मोकळया जागेत, आवारात जरा बरं वाटतं. दम्यासाठी निदान, उपचार, उपकरण, फॉलो अप व वातावरण बदल या सगळयांवर सातत्याने प्रयत्न केले तर दमा बरा होवू शकतो, असेही शेवटी ते म्हणाले.
यावेळी तपासणी आलेल्या रूग्णांची मोफत तपासणी करण्यात येवून, त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
याचवेळी डॉ. छाबडास् एक्ज्युकेटी व हेल्थ चेकअप सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. तरूणा धिरज छाबडा यांनी हेल्थ चेकअप सेंटरमध्ये असणार्या विविध तपासण्या व त्यावर उपाय याविषयी इत्यभुंत माहिती दिली. यावेळी सिप्ला कंपनीचे सय्यद तौसिफ मोहम्मद कैसर, डॉ.राजेश राठोड, डॉ. नेहा जैन यांचा क्लबतर्फे सत्कार कमरण्यात आला. यावेळी मर्चन्ट बँकेचे अध्यक्ष अंंकुशराव राऊत, दिलीप शाह, डॉ. आनंद अग्रवाल, डॉ. मनिष अग्रवाल, पियुश शाह, आनंद वाघमारे आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लॉ. सतिश संचेती तर आभार लॉ. इंद्रराज केदारे यांनी मानले.
Leave a Reply