ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोल्हापूररात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे कारावास

June 25, 202113:26 PM 8 0 0

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ५४ वर्षीय आरोपीस गुरुवारी २० वर्ष कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मोहंमद रफिक शेख असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपी हा येथील संभाजीनगरातील ताराराणी कॉलनीमध्ये राहतो. त्याच्या शेजारीच सात वर्षीय पीडित मुलगी राहत होती. ३० सप्टेंबर २०१५ रोजी तिला खीर खायला देतो असे आमिष दाखवून त्याने घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. बराच वेळ मुलगी बाहेर आली नाही म्हणून शेजाऱ्यांनी पाहिले असता तो दुष्कृत्ये करताना रंगेहात पकडला गेला. नागरिकांनी मुलीची सुटका करून आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणी तिच्या आईने जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. आरोपीविरोधात दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. सात साक्षीदार व सहायक सरकारी वकील श्रीमती ए. ए. पाटोळे यांचा युक्तिवाद ग्रा मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस अधिकारी एम. आर. मोरे यांनी तपास कामी सहकार्य केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *