जालना (प्रतिनिधी) : वंचित उपेक्षित अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपले जीवन समर्पित केले असून त्यांचे विचार व कार्याने प्रेरित होऊन प्रहार सैनिकांनी शेतकरी , दिव्यांग , विध्यार्थी ,निराधार यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे . असे आवाहन प्रहारचे जेष्ठ नेते तथा जिल्हा निरीक्षक नारायण गजर पाटील यांनी केले.
मौजे नांदी व मार्डी येथे रविवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखा फलकाचे अनावरण संघटनेचे जिल्हा निरीक्षक नारायण पाटिल गजर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा समन्वयक प्रदिप शिंदे, मोहन मुंढे ,बदनापूर तालुकाधक्ष सावळाहरी शिंदे, जालना तालुकाध्यक्ष सुदाम इंगोले, रुग्णसेवक जगन ठाकुर, नरेश वाडेकर,घनसावंगी संपर्क प्रमुख राम काकडे, विध्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष मंगेश डोंगरे, जाफराबाद तालुकाध्यक्ष दत्ता भालके ,सुभाष राखुंडे, वखरे, सचिन कदम,सुशील जाधव विष्णु भडक यांची प्रमुख उपस्थिती होती.
नारायण गजर पाटील पुढे म्हणाले, खरिप हंगामातील पेरण्या पुर्ण होत आलेल्या असतांना पिक कर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक सुरू आहे प्रहार सैनिकांनी या समस्येवर लक्ष केंद्रित करावे. अडचणी आल्यास जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतील. असे वचन नारायण गजर पाटील यांनी दिले.
मार्डी शाखा कार्यकारिणी : अंकुश एखंडे, गणेश बामदले, विनोद एखंडे, ऋषी मोटकर, दीपक जैवाळ, अंकुश मुंजाल
किशोर राऊत, गणेश भडक, महेश राऊत, गणेश राऊत, राम सोनवणे, शंकर तार्डे, योगेश राऊत, विठ्ठल जैवाल, शिवाजी बकाल शंकर मोटकर यांचा समावेश आहे .
तर नांदी शाखा कार्यकारिणी : आबेद शेख, प्रवीण घुले, भारत डोंगरे, राहुल घुले, नासेर शेख, प्रदीप डोंगरे, विशाल घुले, वसीम शेख, बाळु घुले,भारत घुले ,अनुराग डोंगरे, सचिन घुले किशोर घुले, दीपक विंचाळ, सतीश घुले,आकाश घुले यांचा समावेश असून या वेळी प्रहार सैनिकांची उपस्थिती होती.
Leave a Reply