ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सीबर्ड शाळेतील मुलांनी बनविल्या आकर्षक राख्या

July 21, 202215:07 PM 23 0 0

उरण ( संगिता पवार ) : भाऊ -बहिणीच्या अतूट नात्याचा सन म्हणजे रक्षाबंधन होय . बहिणीची रक्षा करणे हि जबाबदारी भावाची असते . रक्षाबंधन सन गुरुवारी ( दि. ११ ) ऑगस्ट रोजी असल्याने निमित्ताने उरण शहरातील उरण नगरपरिषदेच्यास्वतंत्र सैनिक दत्ता रहाळकर मैदान बोरी जवळ असलेल्या स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान संचालित सीबर्ड (स्वीकार) असलेल्या या विशेष मुलांच्या शाळेतील मुलांनी रक्षाबंधन सणासाठी रंगीबेरंगी राख्या बनविल्या आहेत.
उरण येथील शाळा, सेवाभावी संस्था, त्या राख्या खरेदी करून या मुलांना नेहमीच मदत करीत आहेत. राख्यांचे अनेक प्रकार आहेत. गोंडा राखी, खड्यांची राखी, मोत्याची राखी, असे प्रकार आहेत. दोन रुपयांपासून ते २५ रुपयांपर्यंत किमतीच्या राख्या येथे उपलब्ध आहेत.
या राख्या युईएस शाळा, सेंटमेरी कॉन्व्हेंट स्कूल उरण, उरण कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय,
, श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर शाळा व पालक आदी शाळा राख्या खरेदी करून मदत करीत आहेत..
उरण-मोरा रोडवरील उरण नगर परिषदेचे स्वातंत्र्यसैनिक दत्ता रहाळकर मैदानामागे, बोरी येथे राख्या मिळतील. शाळेच्या पर्यवेक्षक माधुरी उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश म्हात्रे, मानसी पांचाळ,पल्लवी परदेशी ,मयुरी मयेकर ,प्रशांत कदम ,गणेश जाधव ,स्नेहल राणे , ,, आदी शिक्षक मुलांना राख्या बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत. अधिक माहितीसाठी माधुरी उपाध्ये यांच्या शी संपर्क साधावा .

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *