ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल

February 13, 202114:30 PM 97 0 0

फेब्रुवारीला पुणे शहरातील वानवडी परिसरात एका 22 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. पूजा चव्हाण असं या तरूणीचं नाव होतं. सोशल मीडियावर ‘टिक-टॉक स्टार’ अशी पूजाची ओळख होती. पूजाच्या आत्महत्या प्रकरणात राज्याच्या आघाडी सरकारमधील विदर्भातल्या एका बड्या मंत्र्याचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा धुरळा नुकताच खाली बसलेल्या असतांना आणखी मंत्री महिलेच्या प्रकरणात सापडल्याने सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचं नाव समोर आल्यानं भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
पूजा चव्हाण ही बीड जिल्ह्यातील 22 वर्षीय तरूणी अभ्यासासाठी पुण्याला रहायला आली होती. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी ती भाऊ आणि मित्रासोबत रहात होती. ती पुण्यातील वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळं ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. रविवारी 7 फेब्रुवारीच्या रात्री तिनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका कॅबिनेट मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. याला कारण ठरलंय या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दोन ऑडिओ क्लिप. यात पुजा, तिचा मित्र आणि संबंधित मंत्र्यांचे संभाषण आहे. संभाषणाच्या भाषेवर त्यांच्यात नेमकं काय संबंध होते? हा प्रश्न निर्माण होतो आहे. मात्र, पूजानं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. शिवाय, आमच्याकडं कोणाच्याही विरोधात तक्रार आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र, या प्रकरणी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळं यावरून राजकारण रंगलं आहे.

मंत्री आणि पूजामधील संभाषण :
मंत्री : मी तिला समजविण्याचा प्रयत्न केला. तू ही तिला समजविण्याचा प्रयत्न कर. येतोय मी…
तिचा मित्र : ठिक आहे… ठिक आहे…
मंत्री : खायला काही तरी मागवून घ्या. सकाळपासून तुम्ही उपाशीच आहात ना.
तिचा मित्र : ठिक आहे… ठिक आहे… हूँ…
मंत्री : हूँ….
तिचा मित्र : हूँ… करतो आता जेवण…
ती : तुम्ही तर म्हणत होते, आपण सोबत जेवण करणार होतो म्हणून…
मंत्री : काय?
ती : जेवण
मंत्री : हो! येणार आहे मी. अरूणला सांग काही तरी ज्यूस वगैरे आणून घ्यायला.
ती : हम्म
मंत्री : सकाळपासून तुम्ही तसेच आहात ना. सकाळपासून काही खाल्लंय का? मंच्युरियन वगैरे काही मागवून घ्या. आँ.
ती : बरं
ती : लवकर या… लवकर या…
मंत्री : अं…
ती : लवकर या म्हणतेय मी….
मंत्री : हो

का जोडला जात आहे ‘त्या’ मंत्र्याशी संबंध?

या प्रकरणात समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या दोन ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित मंत्र्यांची मिळताजुळता आवाज असल्याचं बोललं जातं आहे. यासोबतच तिने आत्महत्या केल्यानंतर तिच्या सोबत असलेल्या मित्राला ‘तो’ मंत्री “कोणत्या परिस्थितीत तिच्या जवळचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घे” असं म्हणत असल्याचं म्हणत आहे. तिला दवाखान्यात दाखव हे तो मंत्री का म्हणतोय, हा प्रश्नही यातून निर्माण होतो आहे. या प्रकरणात दोन ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर यात आणखी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप समोर येण्याची शक्यता आहे. यातील बऱ्याच बाबी पुजाच्या मोबाईल पुजाच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये दडलंय काय?आणि लॅपटॉपमध्ये असण्याची शक्यता असल्यानं तिच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात या दोन गोष्टींसोबत तिच्यासोबत राहणाऱ्या दोघांचीही कसून चौकशी होणं गरजेचं आहे.

संबंधित मंत्र्यांवर काय कारवाई होणार?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचं नाव समोर आल्यानं भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची आणि तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. पक्षाच्या महिला आघाडीने यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधित असल्याची चर्चा सुरु आहे. ही ऑडिओ क्लिप खरी आहे का?, याचा तपास होईल. मात्र, तोपर्यंत 22 वर्षांच्या मुलीने आत्महत्या का केली असेल?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच, या ऑडिओ क्लिपची सत्यता बाहेर आल्यानंतर संबंधित मंत्र्यांवर कारवाई होणार का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *