ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

१२ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस

August 11, 202122:05 PM 70 0 0

सध्या जग विनाशाकडे वाटचाल करीत आहे यावर अंकुश लावण्यासाठी “युवकांनी”सामोरं येण्याची गरज आहे. जगातील संपूर्ण युवकांनी घातक हतीयार व जैविक हतीयाराचा कडाडून विरोध करण्याची वेळ आली आहे.संयुक्त राष्ट्र संघाने १७ डिसेंबर १९९९ ला युवा विश्र्व संम्मेलनाच्या कार्यक्रमात ठरविण्यात आले की प्रत्येक वर्षाच्या “१२ ऑगष्टला” युवा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.याप्रमाने पहिल्यांदाच २००० मध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिवसांची सुरूवात करण्यात आली.२०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिवसांचा थीम होता “युवाओं के लिये सुरक्षित स्थान” आणि २०१९ मध्ये थीम होता “ट्रांस्फोर्मिंग एज्युकेशन” परंतु २०२१ चा थीम “युवाओका पृथ्वी को बचाने का प्रयास”.हा थीम असायला पाहिजे असे माझे मत आहे.कारण वैश्विक महामारी आणि पृथ्वीचा होत असलेला ह्रार याला युवा शक्तीच वाचवु शकते. संपूर्ण जगाची धुरा युवकांच्या हाती आहे.कारण आजच्या परिस्थितीत पृथ्वीतलावर “जगात युध्दजन्य परीस्थितीत दीसुन येते.आज प्रत्येक देश एक-मेकावर वरचढ होण्याचा प्रयत्न करीत आहे.यात प्रगती तर नाहीच परंतु विनाश अटळ असल्याचे दिसून येते.आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शि.जिंपिंग यांनी वुहानमध्ये कोरोणा व्हायरस तयार केला आणि याला संपूर्ण जगात पसरविण्याचे काम सुध्दा चीनने केले.यात लाखोंच्या संख्येने जिवीत हानी सुध्दा झाली आहे व करोडोंच्या संख्येने संक्रमीत आहेत.यामुळे जगात मोठे भितीचे वातावरण निर्माण होऊन दहशत निर्माण झाली आहे.अमेरीकेने दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस म्हणजे ६ ऑगस्ट १९४५ साली सकाळी ८ वाजुन १५ मि. हिरोशिमा-नागासाकीवर परमाणु बॉम्ब टाकला होता याचे मुख्य कारण तानाशहा हिटलर यांची क्रृरता नीस्तनाबुत करने होती.परंतु याचे प्रायचीत्य जापानच्या जनतेला भोगावे लागले.यात लाखोंची जीवीत हानीसुध्दा झाली.दिनांक ६ ऑगस्टला या घटनेला ७६ वर्षे पूर्ण झाली.परंतु आज चिनीचांडालच्या कोरोणा व्हायरसने मृत्यूचे तांडव पसरविल्याने जगातील अनेक राष्ट्र चीन सोबत दोन-दोन हात करण्याच्या तयारीत आहे.

अमेरीकेसह नाटोसेनेने चायना सी मध्ये चिनला घेरून ठेवले आहे.परंतु आता जर युद्ध झाले तर “तिसरे महायुध्दच” होईल व यामुळे विनाश अटळ आहे.याला युवावर्गानी कोठेतरी रोखले पाहिजे.कारण चीनने सुपरपावर बनण्यासाठी संपूर्ण सिमांचे उल्लंघन केले आहेत.याला कुठेतरी रोखण्याची गरज आहे.जगातील कोणत्याही देशाचा युवक असो त्याने पशु-पक्षी व मनुष्य प्राणी यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही अशा पध्दतीचे कार्य अंगीकारले पाहिजे.याकरीता चीनच्या युवकांनी शि.जिंनपिंग यांच्या विनाशकारी बायोवेपन्सचा कडाडून विरोध करून चांगला धडा शिकवला पाहिजे.आज संपूर्ण जगाची धुरा युवकांच्या हाती आहे.मानवजातीचा पृथ्वीतलावर जन्म जगण्यासाठी व विकासासाठी झाला आहे.त्यामुळे आजच्या युवकांनी जगाला कोणत्याही परीस्थितीत विनाशापासुन रोखलेच पाहिजे.अन्यथा अनर्थ होऊ शकतो याला नाकारता येत नाही.जर्मनीचा तानाशहा हिटलर यांची कल्पना “विस्तारवादाची” होती परंतु त्याचे प्रायचित्य “हिरोशिमा-नागासाकीच्या”स्वरूपात “जापानला”भोगावे लागले.याची पुनरावृत्ती चीन व चीनच्या मित्रराष्ट्रामध्ये होवु शकते याला नाकारता येणार नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शि.जिनपिंग त्याचे विस्तारवादाचे प्रायचीत्य चीनला व त्यांच्या मित्रराष्ट्रांना भोगावे लागेल.त्यामुळे जगातील युवकांनी या युध्दजन्य परीस्थितीला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर आवाज उठवीण्याची गरज आहे.आज कोरोणा संक्रमनामुळे जगातील युवावर्गांना मोठे अडचणीत टाकले आहे.युवकांच्या रोजगारावर मोठे संकटाचे बादल मंडरावत आहे, संपूर्ण शिक्षणाचा खोळंबा झाला,संपुर्ण जगात मंदीचा काळ ओढवला आहे, अनेकांची घरे उजाडली आहे, उपासमारी,भुकमरी, बेरोजगारी, महागाई, आत्महत्या अशा कठीण प्रसंगांना युवकांना व सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागत आहे.आजचा युवावर्ग फीजीकली कमजोर असला तरी “बुध्दीच्या” बाबतीत तर्बेज, हुशार आणि ताकदवर आहे.त्यामुळे आज कोणत्याही संकटाला निपटण्याकरीता बुध्दीचा योग्य वापर करण्याची वेळ युवकांवर आली आहे.कारण युवाशक्ती “भविष्याची धरोहर” आहे.याची जोपासना करण्याचे काम अनुभवी पीढीने युवकांना मदत करून केले पाहिजे.आज संपूर्ण जग कोव्हीड-१९ मुळे व निसर्गाचा ह्रास होत असल्याने मानवजाती भयभीत आहे.२१ जुलै २०२१ च्या रात्री रायगड जिल्ह्यातील तळीये गावावर पहाड कोसळुन काळोख्यात लोटले ही घटना एवढी भयावह आहे की अंगावर शहारे येतात.ही घटना भारतासह संपूर्ण जगाने उघडल्या डोळ्यांनी पाहिले.या घटनेचे मुख्य कारण म्हणजे मानवाने निसर्गावर केलेला अत्याचार होय.भारताच्या इतिहासात आपण पहील्यांदाच पहात आहोत की निसर्गाचा ह्रास झाल्यामुळे अनेक पहाड, डोंगर-दरे धाराशाही झाले.आज जगात किंवा भारताचा विचार केला तर ९० टक्के झाडांची कटाई रोज होत आहे व फक्त १० टक्के झाडांचे वृक्षारोपण होत आहे ही निसर्गाच्या प्रती घोर शोकांतिकाच म्हणावी लागेल.पहाडावर झाडे जिवीत असती तर तीथे घनदाट जंगल असते यामुळे कोणत्याही पहाडाचे भुस्खनन झालेच नसते.यावरून स्पष्ट होते की मानवाने निसर्गाची पिळवणूक करून राखरांगोळी केल्याचे दिसून येते.त्यामुळे निसर्गाला वाचवीण्याकरीता युवकांनी पुढे येण्याची नितांत गरज आहे. त्याचप्रमाणे जगातील प्रत्येक देशांनी आपल्या वर्चस्वासाठी मोठ्या प्रमाणात दारुगोळा व परमानु बॉम्ब बनवीले आहे.म्हणजेच आज संपूर्ण पृथ्वी “बारुदच्या ढीगाऱ्यावर” बसली आहे.त्यामुळे प्रत्येक देश विनाशाकडे वाटचाल करतांना दिसत आहे.परंतु विध्वंसकारी व विनाशकारी प्रवृत्तीला युवावर्ग रोखु शकते.प्रत्येक देशाच्या युवकांनी शांतीचा मार्ग स्वीकारण्याचे ठाणले तर प्रत्येक देशाचे राष्ट्राध्यक्ष व राजकीय पुढारी युवकांच्या मार्गाला चालना देवु शकते.आपण हिरोशिमा-नागासिकाचा विनाश पहाला आणि आता नुकताच ४ ऑगष्ट २०२० ला “लेबनॉनची राजधानी बेरुत”त्यांची पुनरावृत्ती आपण पहाली.हा धमाका हिरोशिमा-नागासिकापेक्षा महाभयानक असल्याचे सांगण्यात येते.म्हणजेच कोणताही दारूगोळा असो त्याचा फक्त एकच मार्ग असतो तो म्हणजे “विनाश”. त्यामुळे जागतिक विनाशाला युवकांनी कोठेतरी रोखलेच पाहिजे अन्यथा अनर्थ होवु शकतो याला नाकारता येत नाही.सध्याच्या परीस्थितीत युवा शक्ती ही “जगाची धरोहर” आहे.त्यामुळे सर्वांनीच युवकांना सहकार्य करून जी काही “चीनकडून विनाशाची वाटचाल” सुरू आहे तीला ताबडतोब रोखण्याची नीतांत गरज आहे.हे कार्य युवकांच्या शक्तीनेच सफल होवु शकते.युवावर्ग सर्वच क्षेत्रात आमूलाग्र प्रगती करीत आहे यात दुमत नाही.परंतु शि.जिनपिंग,उत्तर कोरियाचा तानाशहा कींग्म जॉन उन,इम्रानखान,तालिबानी सारखे जगाला विनाशाकडे नेत आहे.यांच्यावर अंकुश लावने अती आवश्यक आहे.अझरबैजान-आर्मेनिया युद्ध, अफगाणिस्तान-तालिबानी युध्द ही संपूर्ण पृथ्वीसाठी व मानवासाठी दिवसेंदिवस घातक होत आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने एक गोष्ट सांगावीशी वाटते की भारताची टोकीयो मधील कामगिरी सराहनीह आहे.परंतु आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने भारत सरकारने युवकांना प्रोत्साहीत करून एथलॅटीक्स व अन्य खेळांमध्ये अमेरिका, चीन, रशिया, जापान, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया,जर्मन, इटली,फ्रांस इत्यादी देशांच्या पदक तालीकेमध्ये येण्याकरीता प्रत्येक स्तरावर युवकांना खेळांमध्ये प्रोत्साहीत करायला पाहिजे.युवकांमध्ये नवी उर्जा निर्माण करण्यासाठी सरकारने खेळ बजेटमध्ये वाढ करण्याची नितांत गरज आहे.सरकारने २०२४च्या ऑलिंपिकची आतापासूनच तयारी करने गरजेचे आहे १३५ कोटी जनतेच्या तुलनेत जास्तीत जास्त पदक आणन्याच्या तयारीला आतापासूनच सुरूवात व्हायला पाहिजे.तेव्हाच भारताच्या दृष्टीकोनातून आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने वेगळेच महत्व येईल.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी,नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *