ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आत्मचरित्रात मानवी सूख- दुःखांचे प्रतिबिंब – निर्मलकुमार सुर्यवंशी

June 12, 202213:51 PM 21 0 0

नांदेड – माणूस जगल्या भोगल्याच्या सुख दुःखांचे जिवंत चित्रण आपल्या आत्मचरित्रात करीत असतो. अनेकांनी लिहिलेल्या आत्मचरित्रे येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले आहेत. लिहू शकणाऱ्या प्रत्येकांनी आपले आत्मचरित्र लिहावे. त्यात मानवी भावभावनांचे, सुखदुःखाचे प्रतिबिंब पडलेले दिसते असे प्रतिपादन येथील आघाडीचे प्रकाशक निर्मलकुमार सुर्यवंशी यांनी केले. ते त्यांच्या अक्षरनाती या आत्मचरित्रासंबंधाने बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, प्रज्ञाधर ढवळे, प्रो. डॉ. एम. डी. इंगळे, जी. पी. मिसाळे, रणजीत गोणारकर, साईनाथ रहाटकर आदींची उपस्थिती होती.

महाराष्ट्रातील अग्रगण्य प्रकाशकांपैकी एक निर्मलकुमार सुर्यवंशी हे गणले जातात. त्यांच्या निर्मल प्रकाशनाकडून शेकडो पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येवून त्यांच्याबद्दल अभिष्टचिंतन करण्यात आले. यासाठी सकाळच्या सत्रात प्रा. डॉ.जगदीश कदम, दत्ता डांगे, डॉ. भगवान अंजनीकर, सी आर पंडित, भीमराव राऊत, आनंद पोपुलवार, राजेंद्र देसले, संजय पाटील आदींनी त्यांच्या कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने प्रकाशक आणि लेखकांची जबाबदारी, पुस्तक प्रकाशन प्रक्रियेतील आजच्या समस्या व उपाय या संबंधाने सांगोपांग चर्चा झाली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *