ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

थकीत पगार व इतर देय रक्कम अदा करण्यास अवसायकाकडुन टाळाटाळ

August 2, 202115:14 PM 24 0 0

जालना (प्रतिनिधी) ः जालना सहकारी सुतगिरणीतील कामगारांना औद्योगिक न्यायालयालयाने तडजोडीनुसार थकीत पगार व इतर देय रक्कम तातडीने देण्याचे आदेश अवसायक यांना दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही देय रक्कम मिळत नसल्यामुळे याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालावे असे साकडे कामगारांनी कॉग्रेस पक्षाच्या कायदा सेलच्या जिल्हाध्यक्षा सौ. अँड जयश्री किंगरे यांना घातले आहे.

अँड जयश्री किंगरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना सहकारी सुतगिरणी कामगारांची थकीत असलेली पगाराची व इतर देय असलेली रक्कम मिळावी यासाठी जालना येथील औद्योेगिक न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणात तडजोड घडवुन दि. 13 डिसेंबर 2014 नुसार अवसायक यांनी जालना सहकारी सुतगिरणी मिळकतींची दप्तरची छाननी करून तसेच इतर मार्गानी खातरजमा करून थकीत रक्कम देण्यात येईल असे आश्वासन औद्योगीक न्यायालयालयात तडजोडीच्या वेळी दिले होते.
या आश्वासनानंतर अवसायक व कामगार यांच्यामध्ये तडजोड झाली होती. परंतु तडजोडीनुसार अवसायकांनी आश्वासनाचे पालन केले नाही. तसेच थकीत वेतन व इतर देय रक्कम मिळावी यासाठी कामगारांनी अवसायक यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतू अवसायकांनी कोणतीही दखल घेतली नसल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
या जमीनीचा 2005 पासुन औद्योगिक न्यायालयामध्ये वाद चालू आहे. जालना सहकारी सुतगिरणी बंद पडल्यामुळे साडे चार हजार कामगारांचे नुकसान झाले असून काही कामगारांचे कुटुंब हे रस्त्यावर आले आहे. तरी देखील कामगार हे 2005 पासुन त्यांच्या हक्कासाठी लढत आहे. त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आपल्या स्तरावरून अवसायक न्यायालयामध्ये तडजोडीप्रमाणे कामगारांची रक्कम तातडीने अदा करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर
प्रदीप सिरसाट, नारायण तिकांडे, एकनाथ चाढगे, ?कल्याण चौधरी, पंढरीनाथ गोले, विलास काजळकर, बरीराम जाधव यांची नावे आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *