ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची लोककलेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात विकास कामांचा जागर

March 11, 202215:37 PM 23 0 0

सातारा हिरकणी( विदया निकाळजे): राज्यातील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार असून यासाठी शासनमान्य यादीवरील लोककला पथकांमधील तीन पथकांची निवड करण्यात आली आहे. ‘दोन वर्ष जनसेवेची, ‘महाविकास’ आघाडीची’ या घोषवाक्यासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सातारा जिल्हा माहिती कार्यालयामार्फत व्यापक जनजागृती केली जाणार आहे.
गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने केलेली कामे, राबविलेल्या योजना यांची माहिती जनतेला व्हावीत, यासाठी लोककलेच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातीलच कलाकारांना यासाठी संधी देण्यात आली आहे. याद्वारे सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील वेगवेगळ्या गावांमध्ये तीन लोककला पथकांच्या माध्यमातून विकासाचा जागर होणार आहे. ही मोहिम फलटण, कोरेगांव, रहिमतपूर, तारगांव, वाठार स्टेशन,आसू, दुधेबावी,जिंती येथे आज उत्साहात सुरुवात सुरु झाली आहे.
जिल्ह्यातील 63 गावांमध्ये लोककला पथकांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. त्यात गर्दीचे ठिकाण, तालुका मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, गाव जत्रा, आठवडे बाजार याठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *