ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मराठवाडा समन्वय समिती येथील वसतिगृहात ज्योतिबा फुले विचारांचा जागर

April 12, 202216:41 PM 30 0 0

पुणे (विलास खरात)  : मराठवाडा समन्वय समिती पुणे येथील सुख सागर नगर येथील मुलाच्या वस्तीगृहात क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले बद्दलचे आपले विचार व्यक्त केले. महात्मा ज्योतिराव फुले यांचे उपकार न फिटणारे आहेत.
त्यांनी आपल्याला पाणी खुले करून देण्यापासून ते लढण्या पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवल्या.आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला लढा दिला.
व्यवस्थेला प्रश्न केला.सर्व मानव एक आहेत ही शिकवण दिली.इतकेच नाही तर शिवरायांची समाधी देखील शोधून काढली.आणि आपल्याला शिव विचाराशी जोडून ठेवले.
महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करण आजच्या पिढीला,आणि आपल्या सारख्या विद्यार्थ्यांनाआवश्यक आहे.असे प्रतिपादन वसतिगृहातील विद्यार्थी राम वहिल यांनी केले. यावेळी आनंदी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चैतन्य बनकर यांनी मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *