ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रज्ञाधर ढवळे यांच्या ‘सोनकिडा’ या कथेला पुरस्कार जाहीर

March 19, 202214:25 PM 35 0 0

नांदेड – येथील संवाद प्रागतिक विचार मंचाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून येथील साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे यांच्या ‘सोनकिडा’ या कथेला पुरस्कार जाहीर झाला असल्याचे संयोजन समितीच्या वतीने डॉ. विलास ढवळे यांनी कळविले आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये राज्यस्तरीय खुली कथा स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील कथालेखकांसह विदेशातील मराठीभाषक लेखकांनी यासाठी कथा पाठविल्या होत्या. प्राप्त कथांपैकी ७६ कथा प्रथम परीक्षणातून निवडण्यात आल्या होत्या. यातून येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांच्या ‘सोनकिडा’ या कथेला वाघजी रामजी वाघमारे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
रोख रक्कम, सन्मानचिन्ह व गौरवपत्र हे पुरस्काराचे स्वरूप असून पुढील महिन्यात होणाऱ्या एका कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होणार आहे. यापूर्वी ढवळे यांच्या ‘जोडवं’, ‘इसकालरपीस’, ‘कुसुमाक्का’ आदी कथाही प्रचंड गाजलेल्या आहेत. ‘सोनकिडा’ या कथेला संवाद प्रागतिक विचारमंचाकडून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रज्ञाधर ढवळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *