जालना (प्रतिनिधी) ः जागतिक महिला दिनानिमित्त महिला शक्तीचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी (U.B.S.S.) उज्वल ब.से. संस्थेच्या वतीने अत्यंत सन्मानाचा राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकार जाहिर करण्यात येणार असून या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन उज्ज्वल ब. से.संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. कर्तृत्ववान महिला किंवा मुलींना देण्यात येणार आहे. महिला, मुली, बालकांसाठी तसेच सामाजिक कार्य करणार्या महिलांनी या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने एप्रिल महिन्यात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे स्थळ, वेळ आणि रुपरेषा प्रस्ताव पाठवणार्यांना पत्राद्वारे कळविण्यात येणार आहे. सदरील प्रस्ताव हे दि. 15 मार्च 2021 पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने पाठवता येणार आहेत. सदरील पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी https://forms.gle/bpMdzFrFXBqX8KPf6 या लिंकवर जाऊन प्रस्ताव दाखल करता येणार आहे तर ऑफलाईनचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील नागरीकांनी रूचिरा बेटकर, जामगांवकर निवास, पिवळी गिरणी, गणेश नगर रोड, नांदेड – 431602, मो. नं. 9970774211, येथे तर पश्चिम महाराष्ट्रातील नागरीकांनी विद्या निकाळजे, एकता नगर, सरकारी दवाखान्या शेजारी, दहिवडी ता. माण जिल्हा सातारा 415508, मो. नं. 8600080065 वर संपर्क साधावा. तर इतर महाराष्ट्रातील नागरीकांनी शॉप. नं. 4, कचेरी रोड, शनिमंदीर जवळ, जुना जालना, जालना – 431203 या पत्त्यावर प्रस्ताव पाठवावा असे आवाहन सौ. करुणाताई मोरे, रुचिराताई बेटकर, सौ. विद्या निकाळजे, सौ. रोहिणी बळप यांनी व संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply