ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पांडूरंग कोकुलवार यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

March 4, 202212:34 PM 46 0 0

नांदेड -येथील साहित्यिक तथा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षक पांडूरंग कोकुलवार यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर जयश्री पावडे, आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन अण्णा हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. हणमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आ. अविनाश घाटे, जिल्हाधिकारी विपीन ईटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, शिक्षण सभापती संजय बेळगे, कृषी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, समाज कल्याण सभापती रामराव नाईक, महिला व बालविकास समितीच्या सभापती सुशिला बेटमोगरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या ६९ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. त्यात येथील साहित्यिक तथा हिमायत नगर तालुक्यातील एकंबा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक पांडूरंग कोकुलवार यांना सपत्नीक कुसुम सभागृहात समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, सहसचिव कैलास धुतराज, कार्याध्यक्ष मारोती कदम, शंकर गच्चे, बालाजी मांजरमकर यांची उपस्थिती होती. तसेच एकंबा येथील गावकरी आणि शाळेच्या वतीनेही सत्कार संपन्न झाला. यावेळी सरपंच अश्विनी प्रभू कल्याणकर, केंद्रप्रमुख गणेशराव कोरडे चेअरमन, उद्योजक प्रभू कल्याणकर, उपसरपंच दता कोंकेवाड, परमेश्वर सोनकांबळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खताळ, मोहन चव्हाण, दत्तात्रय भालेराव,सौ ललिता मुंडे, अनंता सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *