नांदेड – तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण केंद्राचे संचालक धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, ऋषीपठण मासिकाचे लोकार्पण, अष्टपुरस्कार, दान पारमिता, चिवरदान, ग्रंथदान, भोजनदान, धम्मगान आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. बौद्धांच्या सांस्कृतिक परंपरेत भिक्खू संघाला प्रदान केला जाणारा आणि वर्षावास काळात उपासकांकडून दान दिला जाणारा असा अष्टपुरस्कार महत्वाचा मानला जातो. शहरातील प्रकाश नगरच्या धम्मसंदेश पथकाकडून आणि श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या भिक्खू संघाकडून भदंत पंय्याबोधी थेरो यांना ‘अष्टपुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी भंते संघरत्न, चंद्रमणी, मेत्तानंद, धम्मकिर्ती, सुदर्शन, श्रद्धानंद, संघमित्र, सुमेध, सुदत्त, सुनंद, शिलभद्र, शिलानंद, ईश्वर जोंधळे, धम्मसेवक गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे, कवी थोरात बंधू, भीमशाहीर सुभाष लोकडे, गायिका माया खिल्लारे, वंदना खिल्लारे, संजय सोनकांबळे, कपिल बिऱ्हाडे, माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस. एच. हिंगोले यांची उपस्थिती होती.
भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या पार्किंग परिसरात ३९ विविध वनौषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही निश्चित करण्यात आली. रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेशदादा सोनाळे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या रक्तदान शिबिरात एकूण २६ दात्यांनी रक्तदान करीत सामाजिक दायित्व निभावले. धम्मसंदेश पथकाकडून १२० ग्रंथाचे दानही करण्यात आले. विविध पक्ष संघटनांचे संस्थापक अध्यक्ष पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून अभिष्टचिंतन केले. भिक्खू संघाकडून अष्टपुरस्कार स्विकारल्यानंतर पंय्याबोधी यांनी आशिर्वाद गाथा पठण केले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यशस्वीतेसाठी उपासक उमाजी नरवाडे, नागोराव नरवाडे, आप्पाराव नरवाडे, उमाजी नरवाडे, वामन नरवाडे, अनिता नरवाडे, सुरेखा नरवाडे, रवी नरवाडे, मधुकर नरवाडे, साहेबराव नरवाडे, कृष्णा नरवाडे, राजरत्न नरवाडे, अनिल नरवाडे, सूरज नरवाडे, संजय नरवाडे, संजय सोनकांबळे, संदिप सोनकांबळे, कपिल बिऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपेक्षा इंगोले, प्रा. एस. एच. हि़गोले यांनी केले तर आभार गंगाधर ढवळे यांनी मानले.
Leave a Reply