ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जागर सामाजिक न्यायाचा या पथनाट्यातून पेण येथे प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी केली समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची जनजागृती

April 18, 202213:06 PM 27 0 0

उरण (संगीता ढेरे) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग रायगड- अलिबाग या विभागांतर्गत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता कार्यक्रमा अंतर्गत सुनील जाधव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, रायगड-अलिबाग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्यातून जनजागृती केली.

सदर पथनाट्यात अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना स्टॅन्ड अप इंडिया या योजने अंतर्गत मार्जिन मनी या विषयाची माहिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, मुला-मुलींकरिता शासकीय वसतिगृहे, उच्च स्तर औद्योगिक प्रशिक्षण, रमाई आवास योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य यांसह विविध योजनांची जनजागृती उपस्थित मान्यवर व जनसमुदायासमोर पेण बस स्थानक व वडखळ बस स्थानक येथे करण्यात आली. यावेळी राजाराम मोरे- गृहपाल शासकीय वस्तीगृह, महाड समाज कल्याण विभाग रायगड यांसह शासकीय कर्मचारी उपस्थित होते. या पथनाट्याचे नेतृत्व राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी, भारत सरकार तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी करीत असून सदर पथनाट्यात प्रतिक कोळी, सुचित जावरे, अमृता शेडगे, प्रसाद अमृते, सागर पाटील, निदिशा वैद्य, प्रगती कासार, स्वप्नाली घुगे, पार्थ म्हात्रे, वैष्णवी नागे आदी कलाकार सहभागी झाले होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *